आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mobile Sim Immediately Activate Through Adhaar Card

आधारद्वारे आता त्वरित अ‍ॅक्टिव्हेट होणार सिम, दोन-तीन दिवस प्रतीक्षेची गरज नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सिम कार्ड विकत घेतल्यानंतर आता ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार नाही. आधार क्रमांकाच्या आधारे सिम कार्ड व्हेरिफिकेशनला सरकारने अधिसूचना जारी केली आहे. दूरसंचार विभाग तूर्तास पथदर्शी योजना म्हणून निवडक शहरांत या योजनेची अंमलबजावणी करणार आहेत. यानंतर देशभर ती लागू केली जाईल.
या सुविधेच्या अंतर्गत सिम कार्ड विकत घेतल्यानंतर ग्राहकाच्या आधार कार्डवर असलेल्या माहितीच्या ऑपरेटर केवायसीची प्रक्रिया ऑनलाइनच पार पाडेल. याच्या काही मिनिटांतच ग्राहकाचे सिम कार्ड अ‍ॅक्टिव्हेट होईल. सध्या सिम कार्ड अ‍ॅक्टिव्हेशनसाठी ओळखपत्र व रहिवासी पुराव्याची प्रत दिल्यानंतर त्याच्या पडताळणीत दोन-तीन दिवसांचा कालावधी लागतो.