आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

139 आणि 5676714 क्रमांकांवर SMS करून बुक करा रेल्वे तिकीट!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मोबाइलहून एसएमएसवर तिकीट बुकिंगची सेवा रेल्वेने शुक्रवारपासून प्रारंभ केली. 139 आणि 5676714 या क्रमांकावर ही सेवा उपलब्ध असेल. इंटरनेटसाठी स्मार्टफोन खरेदी करण्याची ज्यांची ऐपत नाही, अशा कामगार किंवा गरिबांना या सेवेचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे तुमच्या मोबाइलवर इंटरनेटची सुविधा नसली, तरीही या सेवेमुळे तुम्हाला रेल्वेचे तिकीट एसएमएसद्वारे बुक करता येणार आहे.

इंटरनेटच्या स्पीडमुळे अनेक वेळी मोबाइल इंटरनेटवर तिकीट बुकिंगला उशीर होतो. त्यावरही हा एक चांगला पर्याय आहे. रेल्वेने मात्र याला इकोफ्रेंडली आणि कागद वाचवण्यासाठी हा पर्याय सुरू केल्याचे म्हटले आहे. तसेच या नव्या सेवेचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांना ‍होणार आहे. त्यांना आता तिकीट खिडकीजवळ तात्कळत उभे राहावे लागणार नाही.

ग्राहक सेवा सुधारणे आणि ज्यांना इंटरनेट वापरता येत नाही, अशा सर्वसामान्य लोकांसाठी एसएमएस तिकीट सेवा सुरू करत असल्याचे रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

आयआरसीटीसीच्या मदतीने भारतीय रेल्वेने हा उपक्रम सुरू केला आहे. प्रवाशांना यामुळे कुठूनही आणि कधीही तिकीटाचे बुकिंग करता येणार आहे. यासाठी तिकीटाची कोणतीही प्रिन्ट घेण्याची गरज नाही. कारण तुमच्या मोबाईलवर आलेला मेसेज हेच तुमचे तिकीट असणार आहे.

यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईलनंबर आयआरसीटीसी आणिसंबंधित बँकेकडे रजिस्टर करावा लागेल. त्यानंतर संबंधित बँक तुम्हाला एमएमआयडी म्हणजेच मोबाइल मनी आयडन्टीफायर नंबर देईल. यामुळे तुमच्या मोबाईलवर तिकीट बुक करतांना ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड येईल.