आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉमर्स बाजारात मोबाइल बनेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ई-कॉमर्स कंपन्या मोबाइल अॅप्लिकेशन बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. मोबाइल काॅमर्स बाजारासाठी फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अॅमेझॉन आणि क्विकरसारख्या ई-कॉमर्स कंपन्या देशात छोटे स्टार्ट अॅप्स खरेदी करत आहेत. याव्यतिरिक्त मोबाइल टेक्नॉलॉजीवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. येणाऱ्या काळात मोबाइल हा शॉपिंगसाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणार असल्याचा या कंपन्यांचा दावा आहे.

कंपनीला येणाऱ्या ७५ टक्के ऑर्डर मोबाइलच्या माध्यमातून येत असल्याने कंपनीने मोबाइल टेक्नॉलाॅजीवर अधिक भर दिला असल्याचे स्नॅपडीलच्या प्रवक्त्यांनी सांगितले. अशा वेळी एम-कॉमर्स कंपन्यांना सोबत घेणे फायदेशीर असल्याचेही ते म्हणाले.

डाटा विभागावर अधिक भर
स्नॅपडीलने नुकतेच जपानच्या साॅफ्टबँकमधून ६२.७ कोटी डॉलर (जवळपास ३,८०० कोटी रुपये) जमा केले आहेत. यामुळे कंपनीकडे अधिग्रहण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे. त्यातच कंपनी डेटा विभागावर अधिक भर देत आहे. सध्या ई-रिटेलर्सचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार हे मोबाइलवरून होत आहेत. यादरम्यान जर स्नॅपडीलने फ्रीचार्जला विकत घेतले, तर कंपनीचा मोठा फायदा होणार आहे.

"मार्टमोबी' ठेवणार लक्ष
मोबाइल ई-कॉमर्सवर पकड मजबूत करण्यासाठी स्नॅपडीलने हैदराबाद येथील एम-कॉमर्स कंपनी मार्टमोबीला विकत घेतले आहे. स्नॅपडीलच्या वतीने मंगळवारी याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली. मार्टमोबी मोबाइलवर ग्राहकांचे आवश्यक वस्तू खरेदी करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

फ्रीचार्जचे अधिग्रहण शक्य
मार्टमोबी विकत घेण्याआधीच ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडीलने मोबाइल कॉमर्स रिचार्ज कंपनी फ्रीचार्जचे अधिग्रहण केले आहे. हे भारतीय इंटरनेट इंडस्ट्रीमधील सर्वात मोठे अधिग्रहण असल्याचे बोलले जाते. या सौद्यानंतर स्नॅपडील आणि फ्रीचार्ज मिळून भारतातील सर्वात मोठी मोबाइल कॉमर्स कंपनी बनेल. तसेच चीनची मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबानेही पेटीएमचा २५ टक्के हिस्सा खरेदी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...