आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MoD Gets EC Approval For Navy Chief Appointment News In Marathi

नौदलप्रमुखांची नियुक्ती लवकरच शक्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नौदलाच्या पाणबुडीत आग लागल्याच्या कारणावरून डी. के. जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या नौदलप्रमुखपदाच्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. संरक्षण मंत्रालयाने यासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यामुळे मंत्रालयाने ही परवानगी मागितली होती.

नौदलप्रमुखाच्या नियुक्तीसाठी सरकारने पाच सदस्यांची एक समिती नेमली होती. यात व्हाइस अँडमिरल शेखर सिन्हा (पश्चिमी दलाचे प्रमुख), व्हाइस अँडमिरल आर. के.धवन (उपप्रमुख), व्हाइस अँडमिरल अनिल चोपडा (पूर्व दलाचे प्रमुख), व्हाइस अँडमिरल सतीश सोनी (दक्षिण विभागाचे प्रमुख) आणि व्हाइस अँडमिरल एस.पी.एस.चीमा (रणनीतिक दलाचे प्रमुख) यांचा समावेश होता.