आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Addressed On Road Safety In Mann Ki Baat Today

मन की बात : रोड सेफ्टीवर मोदींचा जोर, म्हणाले 50 तास हवी कॅशलेस ट्रीटमेंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : नरेंद्र मोदी - Divya Marathi
फाइल फोटो : नरेंद्र मोदी
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दहाव्या वेळी रेडिओद्वारे देशवासियांबरोबर मन की बात केली. आकाशवाणीवर प्रसारीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमात त्यांनी विजय दिनाच्या निमित्ताने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. मोदींनी रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांचा उल्लेख करत रोड सेफ्टीच्या मुद्यावर जोर दिला. रस्ते अपघातामध्ये जखमी होणाऱ्यांना सुरुवातीच्या 50 तासांत कॅशलेस उपचार देण्याच्या योजनेवर सध्या काम सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे...
>mygov.in वर मला चांगल्या सूचना मिळत आहेत. अगदी मी 15 अॉगस्टच्या भाषणात काय बोलायला हवे, याबाबतही सूचना मिळत आहेत. ऑगस्ट हा उत्सवांचा महिना असतो. त्यामुळे तुमचे सल्ले माझ्या नक्कीच कामी येतील.
>दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील एका अपघाताची माहिती मिळाली. अपघातानंतर दहा मिनिटांपर्यंत स्कूटर चालक रस्त्यावर तडफडत होता. रोड सेफ्टीवर बोलल्यानंतर लोक म्हणतात, तुमची चिंता बरोबर आहे.
>आपल्या देशात दर मिनिटाला एक अपघात होतो. त्यामुळे दर चार मिनिटांना एक मृत्यू होत आहे. मृतांमध्ये सुमारे एक तृतीयांश लोक हे 15 ते 25 वयोगटातील तरुण आहेत. अशा प्रकारच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसतो.
>कधी-कधी ऑटोवर लिहिलेले असते, पापा जल्दी घर आ जाना. त्यामुळे आई वडिलांनी आपल्या मुलांना रोड सेफ्टीकडे लक्ष देण्यास सांगावे ही विनंती आहे.
> आम्ही रोड इंजिनिअरिंग, इमरजंसी केअर, रोड ट्रान्सपोर्ट सेफ्टी बिल आणणार आहोत, त्याचबरोबर अनेक महत्त्वाची पावलेही उचलणार आहोत.
>मध्यप्रदेशच्या हरना जिल्ह्यात सरकारी अधिकाऱअयांच्या एका टीमचे काम उत्कृष्ट आहे. त्यांनी ऑपरेशन मल युद्ध, स्वच्छ भारत अभियानला एक नवे वळण दिले. ब्रदर नंबर वनचे अभियानही छान आहे. यात सर्न भाऊ आपल्या बहिणींना भेट म्हणून टॉयलेट देतील. त्यामुळे रक्षाबंधनाचा अर्थच बदलून जाईल.
>छत्तीसगडच्या एका गावात लोकांनी टॉयलेट्स तयार केले. आता त्याठिकाणी कोणीही उघड्यावर शौचास जात नाही. संपूर्ण गावात त्याचा उत्सव साजरा करण्यात आला. जनतेचे विचार बदलत आहेत. देशाचे नागरिकच देशाला पुढे घेऊन जात आहेत.
>नॉर्थ-ईस्टच्या मुद्यांवर गुवाहाटीचे लोक अॅक्टीव्ह आहेत. त्यासाठी अटलजींच्या कार्यकाळापासून स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात आले आहे. तसेच अधिकाऱ्यांची टीम या राज्यांमध्ये पाठवण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे. ते सात दिवस शिबिर घेऊन सर्वांशी चर्चा करतील. त्यानंतर त्या समस्या सोडवण्यासाठी काम केले जाईल. हीच अॅक्ट ईस्ट पॉलिसी आहे.
>गांवांमध्ये वीजेसाठी मोठी पावले उचलण्यात आली आहेत. जो फायदा शहरांना मिळतो, तोच गावांना मिळावा असे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दीन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना सुरू करण्यात आली आहे.