आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Advices To Use Social Network With Decentness

सोशल मीडियाचा शालीनतेने वापर करा, मोदींचा नेटकरींना सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोशल मीडियाचे समाजशास्त्रच वेगळे आहे. येथे ट्विट आणि फेसबुक कॉमेंट्स फॅशनही आहे अन् सामाजिक जबाबदारीही. त्याने लाेकांना घडवलेही आहे अन् घाबरवलेही आहे. घडवलेल्यांत भारतीत जनता पार्टी, आणि आम आदमी पार्टी आहे, तर घाबरवलेल्यांत काँग्रेस.

‘ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय’च्या गोष्टी करत करत सोशल मीडिया आज सावधान इंडियापर्यंत जाऊन पोहोचला आहे. बहुतेक म्हणूनच नरेंद्र मोदी म्हणाले होते की, सोशल मीडिया नसता तर आज जगाला भारताच्या क्रिएटिव्हिटीची माहितीच कळली नसती. मात्र, हेच माेदी आज नेटकऱ्यांना सावध करत आहेत.

बुधवारी रात्री आपल्या घरी सोशल मीडियावर शे-सव्वाशे समर्थकांसोबत चर्चेत मोदींनी गमतीने म्हणाले, सोशल मीडिया, खासकरून ट्विटरवर अशा अशा शब्दांचा वापर केला जातो की विचारूच नका. खुद्द माझ्याबाबतीत इतके ओंगळ आणि आक्षेपार्ह शब्द लिहिले जातात की ते सर्व छापले तर त्याच्या कागदांनी अख्खा ताजमहाल झाकला जाईल.

मात्र, ‘मित्राें’ तुम्ही कधीच धीर सोडू नका. कधीही या प्रकारच्या शब्दांना त्या प्रकारचे उत्तर देऊ नका. कारण, अभद्र भाषेचा वापर या रोमांचक माध्यमासाठी मोठा धोका ठरेल. ट्विटरवर मला सर्व प्रकारची टीका आणि अपशब्दांचा सामना करावा लागतो. मात्र, मी अाजवर अशा एकाही फॉलोअरला ब्लॉक केलेले नाही. मोदी म्हणाले, मी जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा तुम्ही की - बोर्डच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपशब्द वापरत असतात, हे बरे नव्हे...

मोदींना का करावी लागली ही विनंती
गेल्या काही काळापासून फेसबुक आणि ट्विटरवर आक्षेपार्ह काॅमेंट्स वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक वादही समोर आले, काहींना अटकही झाली. तथापि, गेल्यावर्षी सुप्रीम कोर्टाने अशा कॉमेंट्सला बेकायदेशीर ठरवणाऱ्या आयटी कायद्याचे ६६-ए कलम रद्द केले होते.