आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: गांधी आणि मोदी कुटुंबाची अतिशय दुर्मिळ छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आतापर्यंत भारतीय राजकीय इतिहासात सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचे नेतृत्व करणारे गांधी घराणे अतिशय शक्तिशाली कुटुंब मानले जाते. परंतु, तरीही या कुटुंबाने मर्यादित संवादाची परंपरा कायम राखली आहे. गांधी कुटुंबाचे सदस्य कोणताही सार्वजनिक मंच किंवा मीडियाच्या लोकांसोबत खुलेआम चर्चा करीत नाहीत. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कधीही कोणत्या वृत्तपत्राला किंवा टीव्ही वाहिनीला मुलाखत दिलेली नाही. राजकीय रॅलीमध्ये ते अगदी लिहून दिलेले भाषण वाचतात असे सांगितले जाते. अधून मधून होणारी त्यांची पत्रकार परिषदसुद्धा मॅनेज केलेली असते. त्यात एकदा प्रश्न विचारल्यावर प्रतिप्रश्न विचारण्याची परवानगी मिळत नाही. एवढेच नव्हे तर वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नांवर विचित्र उत्तरे दिली जातात.

या उलट गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा कोणत्याही राजकीय घराण्याशी संबंध नाही. त्यांनी अतिशय लहान पदापासून आपल्या राजकीय कारगिर्दीला सुरवात केली. त्यानंतर मेहनत आणि प्रयत्नांच्या बळावर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. आता त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहे.

दोन्ही कुटुंबीयांची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड क्लिक करा