आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Obama Visit : टाटा ते अंबानी ओबामांची भेट घेण्यासाठी या अब्जाधीशांनी लावली रांग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रपती भवनात झालेल्या स्टेट डीनरदरम्यान ओबामांना भेटण्यासाठी रांगेत उभे असलेले रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदाणी, शशी रुइया, नरायण मूर्ती, साइरस मिस्त्री, अनिल अंबानी.
नवी दिल्ली - तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर असलेल्या बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दोन्ही देशांतील दिग्गज कंपन्यांच्या सीईओंची सोमवारी भेट घेतली. यावेळी अमेरिका आणि भारतातील गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः देशातील विकास कार्यावंर नियंत्रण ठेवणार असल्याचे म्हटले आहे. तर ओबामांनी विविध योजनांबाबत घोषणा केली.

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांना भेटण्यासाठी रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अडाणी यांच्यासह अनेक दिग्गज उद्योगपती रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी इंडिया-यूएस सीईओ फोरमनंतर मोदी आणि ओबामा यांनी सर्व सीईओंबरोबर एक ग्रूप फोटो घेतला. त्यात रतन टाटा, मुकेश अंबानी, साइरस मिस्त्री, अनिल अंबानी आणि चंदा कोचर यांचा समावेशही होता.
दोन्ही देशांच्या बिझनेस लीडर्सचा समावेश
बिझनेस समिटमध्ये अमेरिकेचे 30 बिजनेस लीडर्स सहभागी झाले होते. त्यात पेप्सिकोच्या इंद्रानी नूई, मॅकग्रा हिल फायनांशिअल कंपनीचे चेअरमन हेरॉल्ड मॅकग्रा, मास्टरकार्डचे सीईओ अजय बग्गा यांचा समावेश होता. तर भारताकडून टाटा सन्सचे सायरस मिस्त्री, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी आणि त्यांचे छोटे भाऊ अनिल अंबानी, भारतीय समुहाचे सुनील मित्तल, आयसीआयसीआयच्या चंदा कोचर यांचा समावेश होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इंडिया-यूएस सीईओ फोरमचे PHOTO