आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी आणि मी मिळून कमी काळात इतिहास रचला, ओबामांनी सांगितली 'मन की बात'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मन की बात कार्यक्रमातून आगळावेगळा विक्रम केला. त्यांच्यासोबत अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामांनीही पहिल्यांदाच रेडिओवरून भारतीयांना संबोधित केले. मोदींनी कार्यक्रमाची सुरुवात केली. ते म्हणाले, मी आहे, कारण आम्ही आहोत. भारतात आम्ही म्हणतो, वसुधैव कुटुंबकम. दूरवरच्या आफ्रिकेतील जंगलांतही तेच भाव निर्माण होतात. ओबामा म्हणाले, प्रजासत्ताकदिनानिमित्त तुमच्याकडे येणारा मी पहिला अमेरिकी राष्ट्रपती आहे. पहिल्यांदाच आम्ही दोघे एकत्र लोकांशी बोलत आहोत. अशा प्रकारे सर्वात कमी वेळेत आम्ही इतिहास रचला आहे.
लोकांचेप्रश्न आणि उत्तरे
१. मुंबईच्या राज यांनी विचारले की, परतल्यावर भारतातील अनुभवांबाबत मुलींना काय सांगणार? त्यांच्यासाठी काही खरेदी केली काय?
ओबामा : त्यांनाहीसोबत यायचे होते. पण दुर्दैवाने जेव्हा दौरा ठरला तेव्हा त्या शाळांमध्ये होत्या. भारताची संस्कृती इतिहासाबाबत त्यांना विशेष रूची आहे. माझा कार्यकाळ संपल्यानंतर येथे यायला त्यांना नक्कीच आवडेल.
मोदी: माझेतुम्हाला (ओबामांना) निमंत्रण आहे. राष्ट्रपती कार्यकाळात या किंवा कार्यकाळ संपल्यावर या. तुमचे आणि तुमच्या मुलींचे स्वागत करण्यास भारत उत्सुक आहे.
२.पुण्याच्या सानिका दीवाण हिने विचारले, बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेत आपण ओबामांची मदत मागितली आहे काय?
मोदी : मी मदत मागू किंवा न मागू पण त्यांचे जीवनच प्रेरणादायी आहे. दोन मुलींचे ते जसे संगोपन करतात. मुलींविषयी त्यांना अभिमान वाटतो. हीच मोठी प्रेरणा आहे.
३.अहमदाबादहून डाॅ. कामेश उपाध्याय यांनी विचारले, कार्यकाळ संपल्यानंतर मधुमेह, लठ्ठपणाच्या समस्यांवर काम करण्यासाठी मिशेलसोबत भारतात येणार काय?
ओबामा : कार्यकाळसंपल्यानंतर लठ्ठपणा आरोग्याच्या अन्य मुद्द्यांवर विविध कार्यक्रमांत सहभागी होऊ इच्छितो. मिशेलच्या कामाविषयी मला अभिमान आहे. पंतप्रधान मोदी लोकांच्या आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर बरेच काम करत आहेत.
४.अर्जुन यांनी विचारले की, व्हाइट हाऊसच्या बाहेर पर्यटक म्हणून मोदी यांचा जुना फोटो बघितला होता. सप्टेंबरमध्ये तेथे गेला तेव्हा मनाला काय भावले?
मोदी : पहिल्यांदाअमेरिकेत गेलो तेव्हा व्हाइट हाऊसमध्ये जाणे नशिबी नव्हते. लोखंडी जाळीबाहेर उभे राहून फोटो काढला होता. पंतप्रधान झाल्यावर गेलो तेव्हा बराक यांनी मला माझे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदांचे पुस्तक भेट दिले. एकेक गोष्ट वाचून दाखवली. तेच मनाला भावले.
५.लुधियानाच्या हिमानीने विचारले, ओबामा आज जे आहेत त्या पदावर पोहोचू असे त्यांना वाटले होते काय?
ओबामा :
हेखूप गमतीदार आहे. पंतप्रधान मोदी जसे व्हाइट हाऊसच्या बाहेर लोखंडी कुंपणाजवळ उभे होते. माझ्याबाबत तसेच काहीसे झाले. आमच्या दोघांची सुरुवात पाहता असामान्य संधी आम्हाला मिळाल्या आहेत. चहा विकणारा किंवा माझ्यासारखा सिंगल मदरपासून जन्मलेला मुलगा देशाचे नेतृत्व करू शकतो. ही आमच्या देशातील संधींचे अनन्यसाधारण उदाहरणे आहेत.
मोदी : मीदेखीलकधी या पदाची कल्पना केली नव्हती. सामान्य कुटुंबातून मी आलो आहे. काही बनण्याची स्वप्ने पाहू नका. पाहायचीच असतील तर काही करण्याची स्वप्ने पहा हे मी आधीपासून सांगत आलो आहे. जेव्हा काहीतरी करता तेव्हा नवे काहीतरी करण्याची प्रेरणा मिळत असते.
अमेरिकेत एकत्र संपादकीय लिहिले
मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तेव्हा राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यासोबत त्यांनी संयुक्त संपादकीय लिहिले होते. वाॅशिंग्टन पोस्टमध्ये ते प्रकाशित झाले होते.
३५ मिनिटांचा कार्यक्रम, सामाजिक मुद्द्यांवर फोकस
कार्यक्रम३५ मिनिटे चालला. खुद्द मोदींनीच सूत्रसंचालकाची भूमिका बजावली. चर्चेत राजकीय परराष्ट्र व्यवहाराशी संबंधित मुद्दे नव्हते. दोघांचे व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक मुद्द्यांवर केंद्रित हा कार्यक्रम होता. सोमवारी त्याचे रेकाॅर्डिंग झाले होते. प्रसारण मंगळवारी सायंकाळी झाले. या ठिकाणीही ओबामा यांनी नमस्ते म्हणतच सुरुवात केली.
पुढे ऐका, पुढील स्लाइडवर ऐका मन की बातमध्ये मोदी आणि ओबामांची मते