आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या वाटेतील \'हे\' आहेत काटे !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले असले तरी त्यांच्या दिल्ली प्रवासात अजून अनेक अडथळे शिल्लक आहेत. सत्ताधारी काँग्रेससाठीही 2014 ची निवडणूक सोपी असणार नाही. पक्षाने स्वतः केलेल्या पाहाणीत उत्तरप्रदेश, महाराष्ट्रासह देशात त्यांची स्थिती फारशी आशादायी नाही.

मोदींच्या नावावर पक्षात आणि एनडीएमध्ये फुट पडायला सुरुवात झाली आहे. मोदींचे पंतप्रधानपदाचे स्वप्न भाजपने 200 पेक्षा जास्त जागा जिंकल्यातरच पूर्ण होऊ शकते. असे झाले तरच भाजप पंतप्रधानपदासाठी त्यांचे नाव पुढे करु शकेल. अन्यथा एनडीएच फुटण्याची शक्यता अधिक आहे.

मोदींचे भविष्य आता लोकसभा निवडणूकीच्या निकालावर अवलंबून आहे. कारण, पक्षाने निवडणूकीआधी त्यांना हवे असलेले पद आणि मोकळीक दिलेली आहे. भाजपने त्यांना निवडणूक प्रचार प्रमुख पद देऊन राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या पेक्षा मोठे असलेल्या नेत्यांना त्यांना रिपोर्टींग करण्यास सांगून, कसा प्रचार करायचा आहे त्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्यांना देण्यात आलेले आहे. या निवडणूकीत मोदी पक्षामध्ये प्राण फुंकू शकले नाही तर, त्यांचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वही आगामी काळात मान्य होणार नाही.