आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेहून मायदेशी परतले मोदी, विमानतळावर भाजप नेत्यांची उपस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना भाजप नेते विजय गोयल. - Divya Marathi
पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना भाजप नेते विजय गोयल.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आयर्लंड आणि अमेरिकेच्या एका आठवड्याच्या दौऱ्यानंतर मंगळवारी रात्री उशीला भारतात परतले. रात्री 12 च्या सुमारास मोदी दिल्लीला पोहोचले. मोदी न्यूयॉर्कहून सकाळी साडे पाच वाजता रवाना झाले होते. नवी दिल्लीला येण्यापूर्वी मोदी फ्रँकफर्टला थांबले होते.
दिल्लीच्या पालम टेक्निकल एअरपोर्टवर उतरल्यानंतर पीएमओच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करण्यात आले. अनेकरित्या यशस्वी ठरलेल्या दौऱ्यावरून परतत आहे. ही भारतासाठी एक चांगली संधी होती, असे या ट्विटमध्ये लिहिले होते. पंतप्रधान एअरपोर्टवर येण्यापूर्वीच दिल्लीचे भाजपाध्यक्ष सतीश उपाध्याय आणि भाजप नेते विजय गोयल एअरपोर्टवर पोहोचले होते. एअरपोर्टबाहेरही अनेक भाजप कार्यकर्ते होते.

7 दिवसांच्या या दौऱ्यात मोदी आधी आयर्लंडला गेले होते. 60 वर्षांनी त्याठिकाणी भारताचे पंतप्रधान गेले होते. डबलिनमध्ये त्यांनी आयर्लंडचे पंतप्रधान अँडा केनी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मोदी 23 सप्टेंबरला न्यूयॉर्कला गेले. त्याठिकाणी मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या संमेलनात भाषण केले. पीएम मोदी सॅन फ्रान्सिस्कोच्या सिलिकॉन व्हॅलीमध्येही गेले होते. त्याठिकाणी त्यांनी सोशल नेटवर्किंग साइट फेसबूकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांची भेट घेतली. तसेच टाऊनहॉलमध्ये त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली.

मोदींनी या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस ओलांद, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून, श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरीसेना, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल सीसी, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची मात्र त्यांनी भेट घेतली नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर काही PHOTOS