आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Bats For Coal Auction To Fight Corruption: Modi

कोळसा खाण वाटपातील नुकसानीचा खुलासा द्यावा; PM मोदींची UPAकडे मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुरकेला - २ लाख कोटी रुपयांच्या कोळसा खाणपट्टा वाटप प्रक्रियेच्या यशाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी २०४ खाणपट्टे वाटपात झालेल्या नुकसानीचा यूपीए सरकारने खुलासा करण्याची मागणी बुधवारी केली. लिलावातून आलेला पैसा केंद्राच्या तिजोरीत जाणार नाही. तो ओडिशासारख्या राज्यांना मिळेल. त्यामुळे राज्य सरकारांनी अल्पकालीन योजनांपेक्षा दीर्घ मुदतीच्या योजनांना प्राधान्य द्यावे, असा सल्ला मोदी यांनी दिला.
पंतप्रधान मोदी यांनी ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल आदी पूर्व भागातील राज्यांच्या विकास प्रकल्पांवर लक्ष देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी येथील १२ हजार कोटी रुपयांचा सेलचा पोलाद प्रकल्प राष्ट्राला अर्पण केला. त्यानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते.

मावळत्या सरकारने वाटप केलेल्या २०४ खाणपट्ट्यांतील पैसा गेला कुठे, अशी विचारणा मोदी यांनी केली. सध्याचे सरकार केवळ २० कोळसा खाणींच्या वाटपातून २ लाख कोटी जमा करू शकले. त्यामुळे यूपीए सरकारने त्या वेळची स्थिती स्पष्ट करावी. आपले सरकार पारदर्शक व्यवहारावर भर देईल, यावर मोदी यांनी भर दिला.
पारदर्शकता आणि प्रामाणिकपणावर कसलीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगत मोदी यांनी १० महिन्यांच्या कार्यकाळात कोणताही घोटाळा झाला नाही किंवा आर्थिक अनियमितता झाली नसल्याचा दावा केला.
२० खाणींतून २ लाख कोटी रुपये जमा

कोळसा खऱ्या अर्थाने हिऱ्यात रूपांतरित झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०४ खाणपट्ट्यांचे वाटप रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने २० खाणींचा लिलाव केला. आधीच्या सरकारने चुकीच्या पद्धतीने खाणपट्ट्यांचा लिलाव केल्यामुळे १.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा कॅगने अहवाल दिला. मला आणि अन्य काहींना त्यावर विश्वास बसला नाही. मात्र, २ लाख कोटी रुपयांतून २० खाणींचा लिलाव झाल्यामुळे कॅगचा अहवाल विश्वास ठेवण्यायोग्य आहे, असे पंतप्रधान म्हणाले.