आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडवाणींना मागे टाकून असे झाले मोदी भाजपमध्‍ये नंबर 1

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरेंद्र मोदींचा दिल्‍लीच्‍या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. अनेक अडथळे आणि विरोधकांना नमवून त्‍यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार प्रमुख पद प्राप्‍त केलेच. भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणींचा मोदींना तीव्र विरोध होता. परंतु, त्‍यांनाही बॅकफुटवर यावेच लागले. अडवाणी आणि मोदींमध्‍ये प्रचंड दरी निर्माण झाली आहे. मोदींनी निवड जाहीर झाल्‍यानंतर दुरध्‍वनीवर संपर्क करुन अडवाणींचा आशीर्वाद घेतल्‍याचे सांगितले. परंतु, अडवाणींनी मोदींपासून दूरच राहणे निवडले. त्‍यांनी जयपूरमध्‍ये व्हिडिओ कॉन्‍फरंसच्‍या माध्‍यमातून संवाद साधला. मात्र, गोव्‍यामध्‍ये त्‍यांनी तसे केले नाही. दुसरे म्‍हणजे त्‍यांनी संवादातून मोदींचा उल्‍लेख टाळला. तर मोदींनीही तसेच करतना अडवाणींचे नावही काढले नाही. गोव्‍यात पक्षाच्‍या पोस्‍टरवर अडवाणी दिसले नाही.

एकूणच काय तर मोदींचे 'मिशन दिल्‍ली' सुरु झाले आहे. भाजपचे अध्‍यक्ष राजनाथ सिंह यांनी स्‍पष्‍ट केले की मोदी पक्षातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. भाजपच्‍या निर्णयावर जगभरातील माध्‍यमांमध्‍ये आश्‍चर्य व्‍यक्त करण्‍यात येत आहे. परंतु, भाजपकडे मोदींना पर्याय नाही. त्‍यांच्‍यासारखा जादुई स्‍पर्ष असलेला दुसरा नेता भाजपमध्‍ये नाही, हेदेखील एक वास्‍तव आहे.

मोदींचा काळ आधी असा नव्‍हता. पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि वाचा कसा पालटले मोदींचे दिवस...