आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi Cabinet Expansion Tomorrow, 12 New Ministers Likely To Be Inducted Modicabinet

कॅबिनेट फेरबदल आज: 9 नवे चेहरे घेणार शपथ, 4 माजी अधिकारी; शिवसेना, जदयूचे कुणीच नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र माेदी रविवारी आपल्या मंत्रिमंडळात तिसरा मोठा फेरबदल करतील. राष्ट्रपती भवनात सकाळी १०.३० वाजता शपथविधी होईल. मंत्रिमंडळात नवीन ९ चेहऱ्यांचा समावेश केला जात आहे. यात चार निवृत्त सनदी अधिकारी आहेत. पैकी दोन आयएएस, एक आयपीएस, एक आयएफएस अधिकारी राहिलेले आहेत. कॅबिनेटमध्ये केरळला प्रथमच प्रतिनिधित्व मिळाले आहेत. माजी आयएएस अल्फोन्स कन्ननाथन यांचा समावेश होऊ शकतो. ते केरळ केडरचे अधिकारी राहिलेले आहेत. 

यूपी, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटकातील चेहऱ्यांचाही कॅबिनेटमध्ये समावेश होईल. वृंदावनमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा करून परतलेल्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीनंतर पीएम मोदी यांनी फेरबदलाला अंतिम रूप दिले. त्यांनी स्वत: बायोडेटा पाहून नावे निश्चित केली. तत्पूर्वी शहांनी संभाव्य मंत्री व खातेबदल होणाऱ्या मंत्र्यांशी चर्चा केली. फेरबदलाआधी सात मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. अनेक मंत्र्यांच्या खात्यांत बदलासह काहींना चांगल्या कामासाठी प्रमोशन मिळू शकते. एनडीएमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या जदयू तसेच शिवसेना आणि अण्णाद्रमुकचा कॅबिनेटमध्ये समावेश होण्याची शक्यता नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले की, जदयूचा कॅबिनेटमध्ये समावेशाबाबत भाजपसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही.
 
जदयूला लोजपापेक्षा एक पद जास्त हवे
भाजप आणि जदयूत पेचप्रसंगाची चर्चा आहे. जदयूला दोन मंत्रिपदे हवी आहेत. तसेच त्यांना पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीपेक्षा एक पद जास्त हवे आहे. दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, कॅबिनेट फेरबदलाच्या बातम्या माध्यमांकडून मिळाल्या आहेत. आम्हाला याची काहीच सूचना नाही. आम्ही पदाचे भुकेले नाहीत. 

उमा, निर्मलांची पदे कायम 
उमा भारती यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आहेे. मात्र, त्यांचे खाते बदलले जाऊ शकते. याच प्रमाणे निर्मला सीतारमण यांचेही कॅबिनेटमधील स्थान अबाधित राहू शकते. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांना पर्यावरण मंत्रालय दिले जाऊ शकते. 

अनेक पदे रिक्त 
मंत्रिमंडळात सध्या पंतप्रधानांसह एकूण ७३ मंत्री आहेत. हा आकडा ८१ वर जाऊ शकतो. अनेक पदे रिक्त, तर काही वरिष्ठ मंत्र्यांकडे दाेन-दोन मंत्रालयांचा कार्यभार आहे.
बातम्या आणखी आहेत...