आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षण, स्पोर्ट्स पासून रेल्वेपर्यंत मोदी सरकारच्या काळात प्रथमच झाले हे 7 बदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी मंत्रिमंडळात रविवारी 13 नवे मंत्री सहभागी झाले. यातील 4 कॅबिनेट आणि 9 जणांना राज्यमंत्री केले गेले. प्रथमच पहिल्या टॉप 4 मंत्र्यांमध्ये 2 महिला असतील. निर्मला सीतारमण यांना संरक्षण मंत्रीपद देऊन त्यांचे वजन वाढले आहे. त्यासोबतच 4 सरकारी अधिकाऱ्यांना एकाच वेळी मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. जेडीयूसोबत युती तोडण्याला कडाडून विरोध करणारे माजी गृह सचिव आर.के. सिंह यांना मंत्री करण्यात आले आहे. 
 
मोदी कॅबिनेटमध्ये दिसले हे 7 बदल 
 
#1- 70 वर्षात प्रथमच देशाला पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री 
स्वतंत्र भारताच्या इतिहासात निर्मला सीतारमण यांच्या रुपाने देशाला प्रथमच पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री मिळाल्या आहेत. सीतारमण म्हणाल्या, 'ही फार मोठी जबाबदारी आहे. मला आशा आहे की मी विश्वासाला पात्र ठरले.' यापूर्वी 1975 आणि 1980 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना संरक्षण मंत्रालय त्यांनी स्वतःकडे ठवले होते. 
  
#2- प्रथमच टॉप 4 मध्ये दोन महिला 
टॉप-4 मंत्रालयांमध्ये (गृह, अर्थ, विदेश आणि संरक्षण) प्रथमच दोन महिला मंत्री आहेत. विदेश खाते सुषमा स्वराज यांच्याकडे आहे तर संरक्षण मंत्रालयाची जबाबादीर निर्मला सीतारमण यांना देण्यात आली आहे. त्या आधी वाणिज्य खात्याच्या मंत्री होत्या. आता त्यांना डिफेन्स पोर्टफोलियो देण्यात आले आहे. 
 
#3- प्रथमच ज्यूनिअरचे वजन सीनियर्सपेक्षा जास्त
- संरक्षण मंत्री म्हणून निर्मला सीतारमण या कॅबिनेट कमिटी ऑन सेक्यूरिटी च्या सदस्य असतील. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या गैरहजेरीत संरक्षण मंत्री कॅबिनेटची बैठक बोलावू शकतात. यामुळे जेटली आणि सुषमा यांच्यापेक्षा त्यांचे मंत्रिमंडळातील वजन वाढले आहे.
सीतारमण यांचा भाजप प्रवेश हा अलिकडच्या काळातील आहे. सुषमा स्वराज यांनी त्यांना पक्षात विविध जबाबदाऱ्या देण्याची शिफारस केली होती. 
 
#4- प्रथमच एकाचवेळी चार माजी सरकारी अधिकारी मंत्री  
- असे प्रथमच होत आहे, की चार माजी सरकारी अधिकाऱ्यांना एकाच वेळी कॅबिनेटमध्ये सहभागी करुन घेण्यात आले.
- यात सर्वप्रथम येतात ते मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह (62). त्यांनी 34 वर्षे आयपीएस म्हणून नोकरी केली. सत्यपाल सिंह यांना मानव संसाधन आणि विकास राज्यमंत्री करण्यात आले आहे.  
- दुसरे अल्फोन्स कनन्नथानम (64) हे 27 वर्षे आयएएस होते. केरळ भाजपचा हा चेहरा आहे. त्यांना पर्यटन, इलेक्ट्रॉनिक व सूचना-तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री केले असून त्यांचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे.
- आर.के. सिंह (64) यांनी 38 वर्षे आयएएस म्हणून सेवा केली. ते देशाचे गृह सचिव देखील होते. 
- चौथे आहेत हरदीप सिंह पुरी(65). हे 39 वर्षे आएएस होते. 2009-13 मध्ये यूएनमध्ये भारताचे कायम प्रतिनिधी राहिले आहेत. 
 
#5- प्रथमच कट्टर विरोधकाला कॅबिनेटमध्ये स्थान 
- आर. के. सिंह यांनी भाजपला अनेकदा घरचा आहेर दिला आहे. जेडीयूसोबत आघाडी तोडण्याच्या निर्णयाला त्यांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप तिकीटांची विक्री करत असल्याचा आरोप केला होता. 
- राम मंदिर आंदोलना दरम्यान लालकृष्ण अडवाणींना अटक करण्याचा आदेश देणारे दुसरे-तिसरे कोणी नसून आर.के. सिंह हेच होते.
 
#6- प्रथमच ऑलिम्पिक पदक विजेता क्रीडा मंत्री 
- 2004 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत राज्य वर्धन राठोड यांनी रौप्य पदक मिळवले होते. आता ते देशाचे क्रीडा मंत्री आहेत. विजय गोयल यांच्या जागी त्यांना हे मंत्रीपद देण्यात आले. 
- राठोड हे पूर्वी आर्मीत होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. 
 
#7- प्रथमच 6 वर्षांत 10 रेल्वे मंत्री
- पीयूष गोयल यांना रविवारी रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. गेल्या 6 वर्षातील ते 10 वे रेल्वे मंत्री आहेत. कदाचित हेही प्रथमच घडले आहे. 
- 2011 पासून आपण सुरुवात केली तर तेव्हा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या. त्यानंतर दिनेश त्रिवेदी रेल्वे मंत्री झाले ते 2012 पर्यंत या पदावर होते. 
- त्याचवर्षी तृणमूल काँग्रेसचे मुकुल रॉय यांना रेल्वे खाते देण्यात आले. त्यानंतर काँग्रेसच्या सीपी जोशींकडे ते आले. 
- मे 2013 मध्ये पवनकुमार बंसल रेल्वे मंत्री झाले. त्यानंतर दोन महिन्यांनी पुन्हा सीपी जोशी यांच्याकडे हा प्रभार आला. 
- 2014 मध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांना रेल्वे मंत्री करण्यात आले. 
- मोदी सरकारमध्ये सदानंद गौडा पहिले रेल्वे मंत्री झाले. त्यानंतर कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसलेल्या सुरेश प्रभू यांना रेल्व मंत्री करण्यात आले. आता पीयूष गोयल यांना बढती देत रेल्वे मंत्री केले आहे. 
 
हेही वाचा
बातम्या आणखी आहेत...