आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INSIDE STORY: मोदींना प्रथमच राजनाथ-सुषमांसह 4 नेत्यांकडून मिळाले आव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजनाथ सिंह यांच्या घरी 1 सप्टेंबर रोजी रात्री बैठक पार पडली. - Divya Marathi
राजनाथ सिंह यांच्या घरी 1 सप्टेंबर रोजी रात्री बैठक पार पडली.
नवी दिल्ली - पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच मोदींचा आपल्या मंत्रिमंडळातून वरिष्ठ सहकाऱ्यांकडून आव्हान मिळाले आहे. 1 सप्टेंबरच्या रात्री गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी नितीन गडकरी, अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांची बैठक झाल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान मोदी सुविधांच्या दृष्टीकोनातून बड्या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी इच्छुक होते. मात्र, राजनाथ सिंह यांनी वृंदावनच्या केशवधाममध्ये सुरू असलेल्या संघाच्या बैठकीला संदेश पाठवला. यात त्यांनी मंत्रिपद सोडून पक्ष, संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
 

3 तास चालली बैठक
- राजनाथ यांचे पत्र वृंदावनमध्ये पोहोचले त्यावेळी पक्षश्रेष्ठींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुद्धा बडे नेते उपस्थित होते.
- यानंतर संध्याकाळी गडकरी, सुषमा आणि जेटली राजनाथ यांच्या घरी पोहोचले. त्यांची बैठक तब्बल 3 तास सुरू होती. 
- यात सर्वानुमते निर्णय घेण्यात आला, की साडे तीन वर्षांपासून सांभाळत असलेले मंत्रालय सोडून ते दुसऱ्या मंत्रालयांत गेले. तर, त्यांनी आपल्या मंत्रालयांत यापूर्वी केलेल्या कामांचे श्रेय दुसऱ्या (नवीन) मंत्र्यांना जाईल. 
- यानंतर 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता जुन्या आणि नवीन मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मात्र, कुणाला कोणते मंत्रालय दिले जाणार हे मोदींपुढे आव्हान ठरणार असे सांगितले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...