आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याच 10 वादांमुळे स्मृती इराणींकडून काढून घेतले मनुष्यबळ विकास मंत्रालय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - दोन वर्षांपासून चर्चेत राहिलेल्या स्मृती इराणींकडून मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून त्यांना वस्त्रोद्योग मंत्रालय दिले. बढती मिळालेले प्रकाश जावडेकर आता मनुष्यबळ विकास मंत्रालय पाहतील. इराणी यांच्‍याकडून हे खाते का काढून घेतले, त्‍याची कारणे खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
स्‍मृती इराणी पदवीचा वाद
> स्मृती इराणी यांच्या पदवीचा वाद हा तसा जुना आहे.
> पण, इराणी यांनी आपल्या शिक्षणासंबंधात खोटी प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाकडे दाखल केल्याच्याही आरोप होत आहे.
> 2004 मध्ये इराणी यांनी दिल्ली येथील चांदनी चौक येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रतेच्या रकान्यात कला शाखेच्या पदवीधर असल्याची माहीती नमूद केली होती. बी.ए.- 1996 दिल्ली विद्यापीठ (करस्पांडन्स) अशी माहिती त्यांनी त्यावेळी दिली होती.
> जुलै 2011 मध्ये राज्य सभेच्या निवडणुकीदरम्यान इराणी यांनी प्रतिज्ञापत्रात बॅचलर ऑफ कॉमर्स पार्ट- 1, 1094 दिल्ली विद्यापीठ (करस्पांडन्स) अशी माहिती दिली आहे.
> 16 एप्रिल 2014 रोजी अमेठीतून दाखल केलेल्या अर्जात त्यांनी शैक्षणिक पात्रतेच्या रकान्यात वाणिज्य शाखेच्या पदवीधर असल्याचे म्हटले आहे.
> या प्रतिज्ञापत्रात त्यांनी बॅचलर ऑफ कॉमर्स पार्ट- 2, 1994 दिल्ली विद्यापीठ (करस्पांडन्स) अशी माहिती दिली आहे.
> अमेठीतून निवडणूक लढवत असताना तेथील काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी इराणी यांच्या या खोटारडेपणावर जोरदार आक्षेप घेतला होता.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, इतर नऊ वादाबाबत....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...