आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Calls For Shutdown Of Fuelled Vehicles For A Day In Wk

भारतीय शहरांचा श्वास होणार मोकळा, रविवारी सायकलस्वारी !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने पाऊल टाकले. देशात प्रथमच वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सुरू करण्यात आला. या वेळी पंतप्रधान मोदींनी लोकांना आठवड्यातून एकदा सायकल चालवण्याचे आवाहन केले. राज्यांच्या पर्यावरणमंत्र्यांच्या परिषदेत त्यांनी विकसित देशांना खडे बोलही सुनावले. मोदींच्या आवाहनानुसार सर्व राज्यांचे पर्यावरणमंत्री देशभरात एक दिवस सायकलस्वारीची योजना आखत आहेत.

फायद्याचा उपाय
- सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा काय ते एक्यूआय सांगणार. - प्रदूषण वाढीने आरोग्यावर काय परिणाम होईल, त्यापासून बचाव कसा करायचा हेही सांगितले जाईल. - प्रदूषण आणीबाणीचा अंदाज घेऊन तत्काळ उपाय केले जातील.

१० शहरांत प्रणाली
दिल्ली, आग्रा, कानपूर, लखनऊ, वाराणसी, चेन्नई, फरिदाबाद, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद. सप्टेंबरपासून २२ राज्यांच्या राजधानीची शहरे आणि उर्वरित १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या ४४ शहरांत ही प्रणाली लागू होईल.

सायकल चालवणे सुरू केल्यास अनेक फायदे
पैसा : रोज १५ कोटींची बचत

दिल्लीतफक्त एक दिवस पेट्रोलच्या गाड्या बंद ठेवल्या तर १५ कोटींची बचत. म्हणजे वर्षभरात ५५०० कोटींची बचत. सीएनजीने होणारी बचत वेगळी.

आरोग्य : ५०% हृदयरोगात घट
आठवड्यातूनएक दिवस किमी सायकल चालवल्यास 8% आणि सातही दिवस चालवल्यास ५० % हृदयरोग नियंत्रणात आणणे शक्य.

एअर क्वालिटी इंडेक्स’ जारी करणार्‍या देशांत भारत सहभागी झाला. पंतप्रधानांनी त्याची सुरुवात केली. मात्र, यातील अव्वल देशांच्या नेत्यांनी त्याचा आदर्श घालून दिला आहे. असे चित्र आपल्या देशात दिसेल?

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, लंडनचे महापौर, डेन्मार्कचे प्रिन्स आणि हॉलंडचे पीएम यांनी सुरु केलेल्या सायकल योजना का यशस्वी ठरल्या...