आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Camp Will Not Compromise With PM Post Prefer To Sit In Opposition

मोदींसाठी भाजपची विरोधी बाकावर बसायची तयारी, मात्र पंतप्रधानपदाशी तडजोड नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निवडणुकीमध्ये विजय मिळाल्यानंतर भाजप पंतप्रधानपदाची माळ राजनाथ सिंह यांच्या गळ्यात घालणार, असे दावे सध्या विरोधकांकडून केले जात आहेत. मात्र कोणतीही परिस्थिती उद्भवली तरीही पंतप्रधानपदी मोदींनाच विराजमान केले जाणार असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मोदींच्या टीममधील सूत्रांच्या मते जर एनडीएला बहुमत मिळाले नाही, आणि सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागली तरीही मोदींच्या पंतप्रधानपदाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. वेळप्रसंगी पक्ष विरोधी बाकावर बसणे पसंत करेल पण पंतप्रधान मोदीच बनणार असा दावा सुत्रांनी केला आहे.

दुसरीकडे मतदानाच्या सात टप्प्यांनंतर भाजपच्या काही गटांमध्ये बहुमताच्या मुद्यावरून चिंता व्यक्त केली जात आहे. एनडीएला बहुमतासाठी आवश्यक असणारा 272 टप्पा गाठणे अवघड जाणार असल्याची भीती या गटाकडून व्यक्त केली जात आहे. भाजपला भीती असली तरी आतापर्यंत झालेल्या जनमत चाचण्यांमध्ये भाजपचीच सरशी होणार असल्याचे चित्र दिसून आलेले आहे. त्यामुळे आता नेमके चित्र काय आहे, ते 16 मे रोजीच स्पष्ट होणार आहे.

पुढे वाचा.. कोणताही बी प्लॅन नाही, मोदी गटाचे स्पष्टीकरण