आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा चहा V/s आसामचा चहा, जाणून घ्‍या चहा संबंधीची रोचक माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- जग प्रसिध्‍द ' आसाम' चहाला नरेंद्र मोदींच्‍या चहाने नविन आव्‍हान निर्माण केले आहे. आसाम चहा जगभरामध्‍ये प्रसिध्‍द चहा म्‍हणून ओळखला जातो. या चहामध्‍ये मोंदी नावाचे फ्लेवर मिसळल्‍यामुळे 'आसाम' चहासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्‍याचे झाले असे की, नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिमा उंचावण्‍यासाठी 'चाय वाला' मोदी हा प्रचाराचा मुद्दा बनविला आहे. आसाम राज्‍य चहा निर्मातीमध्‍ये जगात प्रसिद्ध असले तरी, या राज्‍यामध्‍ये आतापर्यंत कॉंग्रेसचा एकछत्री अमंल राहिला आहे. कॉंग्रेसला आसाममधून उखडून टाकण्‍यासाठी भाजपाने 'चाय वाला' मोदी हा प्रचाराचा मुख्‍य मुद्दा बनवीला आहे.
शनिवारी गुवाहटीमध्‍ये महाजागरण रॅलीला संभोधीत करताना मोदींने कॉंग्रेसवर हल्‍ला चढवला. या भाषणामध्‍ये त्‍यांनी जनतेला प्रश्‍न विचारला, आसामची गरीबी कुणामुळे आहे ? प्रचार सभेच्‍या दरम्‍यान मोदी यांनी सांगितले की, मी स्‍वत: 'चाय वाला' असल्‍यामुळे मला इथल्‍या प्रश्‍नांची चांगली जाणीव आहे. आसामधील 900 चहाच्‍या मळ्यात काम करणारे 9 लाख मतदार असल्‍यामुळे चाय वाला मोदीच्‍या माध्‍यमातून भाजप मतदारांना आपले करण्‍यासाठी प्रयत्‍न करत आहे. या प्रयत्‍नाला चांगले यश आले असून आसाममध्‍ये मोदींला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुवाहटीच्‍या लोकांनी वेळातवेळ काढून भाजपने आयोजीत केलेल्‍या ' मोदी चाय' चा अस्‍वाद घेतला.
आसाममधील चहा उद्योग आणि कर्मचारी यांच्‍या प्रश्‍नांवर अंदोलन उभे केल्‍यामुळे भाजपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारताला स्‍वतंत्र्य मिळाल्‍यापासून आजपर्यंत आसाममध्‍ये कॉंग्रेसचा दबदबा राहिलेला आहे. सध्‍याही कॉंग्रेसचे सरकार आहे. मागील दहा वर्षापासून इतर पक्षाचा कॉंग्रेस समोर निभाव लागलेला नाही. पंरतु मागील काही वर्षापासून मजुरांचे प्रश्‍न, आरोग्‍याचे प्रश्‍न, कामगारांच्‍या प्रश्‍नासंदर्भांत कॉंग्रेस सरकारपुढे नविन पेच निर्माण झाले आहेत.
एशियन ह्यूमन राइट्स कमीशन (एएचआरसी)ने नुकत्‍याच दिलेल्‍या अहवालानुसार आसाम सरकार चहाच्‍या मळ्यातील कामगारांच्‍या अधिकराचे रक्षण करण्‍यात अपयशी ठरली आहे. या अहवालानुसार ऑक्‍टोंबर 2011 मध्‍ये चहाच्‍या मळ्यात काम करणा-या 11 मजुरांचा उपाशी राहिल्‍यामुळे मृत्‍यु झाला होता. नरेंद्र मोदींच्‍या 'चाय वाला' या ईमेजमुळे या कामगांराची सहानुभुती पक्षाला मिळेल असे भाजपला वाटत आहे.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या 'चहा' चा इतिहास आणि राजकारण