आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'TIME\' च्या कव्हरवर मोदी, मुलाखतीत गरीबीबाबत बोलताना दाटून आला कंठ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रचंड बहुमताने सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी २६ मे रोजी पंतप्रधानपदाचे एक वर्ष पूर्ण करतील. त्यांनी अमेरिकेच्या 'टाइम' नियतकालिकाशी शासन-प्रशासन, देश व विदेशातील परिस्थितीवर मुक्त चर्चा केली.

दहशतवादी संघटनांबाबत ते म्हणाले, अतिरेक्यांना नेम-प्लेट लावून पाहू नये. प्रेरणेच्या प्रश्नावर तर त्यांचा कंठ दाटून आला. मोदी म्हणाले, आपण अतिरेक्यांना त्यांचा समूह, भौगोलिक स्थिती वा पीडित, या चष्म्यातून पाहू नये. ते समूह वा नाव बदलत असतात. आज तुम्ही तालिबान, आयएसला पाहत आहात, उद्या नव्या नावाने पाहाल. दहशतवादाला धर्मापासून वेगळे करावे लागेल, यामुळे अतिरेकी एकटे पडतील.

गरिबीतून प्रेरणा
मी अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलो. लहानपणी रेल्वेत चहा विकायचो. माझी आई दुसऱ्यांच्या घरी भांडी घासण्याचे काम करायची. मी जवळून गरिबी अनुभवली, गरिबीत आयुष्य काढले आहे. माझे सर्व बालपण हे गरिबीतच गेले आहे. गरिबी हीच माझ्या आयुष्यातील पहिली प्रेरणा होती.