नवी दिल्ली/बीजिंग - एनएसजी ग्रुपमध्ये भारताच्या सदस्यत्वाला चीनकडून होणार विरोध लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाकडे मोर्चा वळविला आहे. शनिवारी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्यासोबत फोन वरुन चर्चा केली. रशियाने अणुपुरवठादार गटात भारताला स्थान देण्यासाठी समर्थन दिले आहे.
द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासंबंधी बातचीत
- क्रेमलिन यांच्या वक्त्यव्यानुसार फोन कॉल मोदींनी केला होता.
- यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर जोर दिला.
- मोदी आणि पुतिन यांची लवकरच भेट होण्याची शक्यता आहे.
- या भेटीत दोन्ही देशांतील प्रॅक्टिकल इश्यूज आणि परस्पर सहकार्यांवर लक्ष्य केंद्रीत केले जाईल.
चीनचा दावा ; व्हिएन्नात मुळात चर्चाच झाली नाही
अणुपुरवठादार गटात भारताला सदस्य करून घेण्यात यावे यासाठी अमेरिकेने जोर लावला अाहे. परंतु एनपीटी करारावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांबाबत एनएसजी सदस्यांत फूट पडली आहे. व्हिएन्नातील बैठकीत भारताच्या सदस्यत्वावर मुळात चर्चाच झाली नाही, असा भलताच दावा आता चीनने केला आहे.
अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी करणाऱ्या देशांत भारताचाही समावेश होतो, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हाँग लेई यांनी म्हटले आहे. 9 जून रोजी व्हिएन्नात एनएसजीच्या 48 सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अधिकृत नव्हती. एनएसजीचे अध्यक्ष तथा अर्जेंटिनाचे राजदूत राफेल मारिआनो ग्रॉसी यांनी ही बैठक घेतली होती. बैठकीसाठी कोणतीही विषयपत्रिका नव्हती. केवळ राष्ट्रप्रमुखांनी एकत्र येऊन 24 रोजी सेऊल येथे होणाऱ्या बैठकीची तयारी करण्याचा उद्देश होता, असे चीनकडून सांगण्यात आले. पाकिस्तानने एनएसजीमध्ये भारताला सदस्य करण्यासंबंधीच्या मागणीला जोरदार आक्षेप घेतल्यानंतर चीनचेही समर्थन मिळवले होते.
पुढील स्लाइडमध्ये, जॉन केरी यांचे पत्र