आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Done Fake Encounter, Finance Minister P.Chidambaram Allegation

मोदींकडून आकड्यांचे ‘फेक एन्काउंटर’, अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रालोआ सरकारच्या काळात 8.4 टक्के विकासदर साध्य केल्याचा नरेंद्र मोदी यांचा दावा पोकळ असून ते आकड्यांचे ‘फेक एन्काउंटर’ करत असल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. मोदी वस्तुस्थितीला धरून बोलत नसल्याचे ते म्हणाले.चिदंबरम यांच्या टिकेला भाजपनेही उत्तर दिले असून चिदंबरम आकड्यांचा ‘दहशतवाद’करत असल्याचे भाजपने म्हटले आहे.


अटलबिहारी वाजपेयी यांच्या सत्ताकाळात (1998-99 ते 2003-04) सरासरी 6 टक्के विकासदर होता. शेवटच्या पाच वर्षांमध्ये तो 5. 9 टक्के राहिला, असे चिदंबरम यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. संपुआच्या पहिल्या टप्प्यात 8.4, तर दुस-या टप्प्यातील चार वर्षांत 8.4 टक्के विकासदर होता. 2000-01 (4.3%) आणि 2002-03 (4%) मध्ये सर्वांत कमी विकास दर राहिला. वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात 8.4 टक्के विकासदर राखल्याचा दावा मोदी यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर चिदंबरम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी रालोआच्या काळातील प्रत्येक वर्षाच्या विकासदराची आकडेवारी जाहीर केली. नरेंद्र मोदी वस्तुस्थितीचे फेक एन्काउंटर का करत आहेत, सत्य लपून राहणार नाही. संपुआ-1 विकासदराच्या दृष्टिकोनातून सुवर्णकाळ होता, असे चिदंबरम यांनी नमूद केले.