आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Faces Delhi Election Defeat In First Vote Setback Exit Polls

दिल्ली विधानसभा : एक्झिट पोलमध्ये मोदी नापास; दिल्लीत ‘आप’चे सरकार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेसाठी शनिवारी विक्रमी सुमारे ६८ टक्के मतदान झाले. देशाच्या एकूणच राजकारणावर प्रभाव टाकणार्‍या या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला (आप) स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. एका एक्झिट पोलमध्ये तर आपला ७० पैकी तब्बल ५३ जागा म्हणजे बहुमतासाठी आवश्यक जागांपेक्षा १७ जागा जास्त मिळण्याचा अंदाज बांधला आहे. ‘चलो चले, मोदी के साथ’ असा नारा देणारा भाजप दुसर्‍या क्रमांकावर जाण्याची शक्यता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला ओहोटी मानण्यात येत आहे.

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीवरील जनमताचा कौल असेल, असा दावा बहुतांश राजकीय विश्लेषकांनी केला आहे. पण भाजपला तो मान्य नाही. मोदींच्या नावावर मते मागणार्‍या भाजपला नाकारून दिल्लीकरांनी केजरीवालांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचे संकेत यामधून मिळाले आहेत. विशेष म्हणजे दिल्लीवर तब्बल १५वर्षे सत्ता गाजवणरी काँग्रेस खूपच मागे गेली असून एकाही एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला ५ पेक्षा जास्त जागा देण्यात आलेल्या नाहीत. या निवडणुकीत कडवट व खालच्या पातळीवरील प्रचार पहायला मिळाला.