आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Facing Threat From Right Wing Fundamentalists For Wooing Muslims

मोदींच्या जीवितास हिंदू दहशवाद्यांकडूनही धोका : इंटेलिजेंस रिपोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदी यांच्यार भोवती असलेले सुरक्षा रक्षकांचे कडे. - Divya Marathi
नरेंद्र मोदी यांच्यार भोवती असलेले सुरक्षा रक्षकांचे कडे.
नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या जीवितास मुस्‍लीम दहवाद्यांसोबतच हिंदू दह‍शवाद्यांकडूनही धोका आहे. असा गौप्‍यस्‍फोट दिल्ली पोलिसांच्‍या एका इंटेलिजेंस रिपोर्टमध्‍ये करण्‍यात आला आहे.
त्‍याच दृष्‍टीने गेल्‍या महिन्‍यात 21 जूनला झालेल्‍या आंतराष्‍ट्रीय योग दिनाच्‍या कार्यक्रमात पंतप्रधानांसाठी विशेष सुरक्षेची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. एका इंग्रजी वेबसाइटने दिल्‍ली पोलिसांचा हा अहवाल प्रकाशित केला आहे.
काय आहे प्रकरण
योग दिनाच्‍या दिवशी राजपथवर झालेल्‍या कार्यक्रमामध्‍ये पंतप्रधानाच्‍या सुरक्षेसाठी दिल्‍ली पोलिसांच्‍या इंटेलिजेंस युनिटने एक खास अहवाल तयार केला होता, असा दावा एका इंग्रजी वेबसाइटने केला आहे. या अहवालामध्‍ये लष्‍कर-ए-तौएबा, इंडियन मुजाहिदीन आणि हिजबुल मुजाहिदीन यांच्‍यापासून मोदींना धोका असल्‍याचे सांगितले होते. मात्र, यात आश्‍चर्याची बाब म्‍हणजे हिंदू दहशवाद्यांकडूनही पंतप्रधानाच्‍या जीवितास धोका असल्‍याचा इशारा दिला होता.
का नाराज आहेत मोदींवर हिंदू संघटना
अहवालानुसार, काही हिंदू संघटनांना वाटतेय की, मोदी हे मुस्‍लीमांना आकर्षित करण्‍यासाठी जास्‍त प्रयत्‍न करत आहेत. दरम्‍यान, गुजरात दंगल प्रकरणात अनेक हिंदू नेत्‍यांना शिक्षा ठोठावली गेली. याच दोन कारणांनी काही हिंदू संघटना मोदी यांच्‍यावर नाराज आहेत. अहवालात स्‍पष्‍ट म्‍हटले, “ पंतप्रधानांना काश्मि‍री आतंकवादी, इंडियन मुजाहिदीन आणि कट्टरपंथी मुस्‍लीम संघटनांपासून धोका आहे. शिवाय गुजरात दंगलीमध्‍ये हिंदू नेत्‍यांना शिक्षा ठोठावली गेली त्‍यामुळे काही हिंदू संघटनांपासूनही त्‍यांना धोका आहे.”
राजपथवर कडक सुरक्षा
अहवालानुसार, पंतप्रधानांना 40 संगटनांपासून धोका आहे. यामध्‍ये दहशवादी संघटनांसोबतच नक्षलवादी, नॉर्थ-ईस्टमधील घुसखोर आणि अंडरवर्ल्डचासुध्‍़दा समावेश आहे. योगदिवसाच्‍या अनुषंगाने विमान हल्‍ल्‍याची भीती व्‍यक्‍त केली गेली होती. त्‍यामुळे अनुचित प्रकार टाळण्‍यासाठी दिल्‍ली पोलिसांनी पतंग, फुगे आणि ग्लायडर उडवण्‍यावर काही काळासाठी बंदी घातली होती. राजपथजवळील सर्वच मोठया इमारतीवर स्नायपर्स तैनात होते. शिवाय, संपूर्ण राजपथची टेहळणी करण्‍यासाठी ड्रोन कॅमऱयांचाही वापर केला गेला.