आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Fastest Learned Diplomacy, Foreign Ministry Brought In Hindi

मोदी समर्थक नेत्याला पक्षातून निलंबित करणाऱ्या जयललिता मोदींचीच घेणार भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) च्या नेत्या जे. जयललिता तीन जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. जयललितांनी एनडीएमध्ये यावे यासाठी भाजप प्रयत्नात असतानाच ही भेट होणार असल्याने राजकीय चर्चांना उत आला आहे.

भेटीचा उद्देश

आधिकृतपणे देण्यात आलेल्या माहितीनुसार जयललिता साउथ ब्लॉकमधील मोदींच्या कार्यालयात जाऊन तामिळनाडूशी संबंधित महत्त्वाच्या मुद्यावर पंतप्रधानांबरोबर चर्चा करणार आहेत. राज्याच्या हिताशी संबंधित मुद्यावर लक्ष देण्यासाठी केंद्र सरकारला निवेदन सादर केले जाणार असल्याचेही अधिका-यांनी सांगितले आहे.

तज्ज्ञांची मते मात्र वेगळी
तामिळनाडूमध्ये जयललिता यांना मिळालेले यश पाहता भाजप नेते त्यांना आपल्या पक्षात समाविष्ट करुन घेण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चा आहेत. राज्यात 39 पैकी 37 जागांवर एआयएडीएमके विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर हातमिळवणी केल्यास तेथे पक्षाची ताकद वाढवण्यास मदत होणार असल्याचे पक्षाचे मत आहे. राज्‍यसभेमध्ये भाजप आणि त्यांच्या सहका-यांचे संख्याबळ 65 आहे. याठिकाणी एआयएडीएमके चे 11 सदस्य आहेत.

आणखी एक कारण म्हणजे सरकारविरोधात प्रबळ विरोधीपक्ष तयार होऊव नये, असे भाजपला वाटत आहेत. काँग्रेसला त्यांनी 44 वर गुंडाळले. पण लेकिन जयललिता, ममता बॅनर्जी आणि नवीन पटनायक एकत्र आले तर एक प्रबळ विरोधीपक्ष तयार होण्याच्या भीतीने भाजप या पक्षांच्या संपर्कात आहे. ममतांच्या तृणमूल कांग्रेसचे 12 तर नवीन यांच्या बीजदचे सहा सदस्य राज्यसभेत आहेत.

मोदींशी मैत्री
जयललिता यांची मोदींबरोबरची मैत्री सर्वश्रुत आहे. मात्र, तरीही त्यांनी महिंदा राजपक्षे यांना आमंत्रण पाठवल्याच्या मुद्यावरून मोदींच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थिती लावण्यास नकार दिला होता. जयललिता यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर मोदींना शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र काही दिवसांपूर्वीच भाजपची मैत्री करण्याची भाषा करणा-या नेत्यांनी त्यांनी निलंबितही केले होते.

पुढे वाचा - राजकारणच नव्हे प्रशासकीय कारभारातही मोदी सर्वांच्या पुढे