आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi First PM To Use Tunnel From 7RCR To Safdarjung Airport

नरेंद्र मोदींच्या शासकीय निवासस्थानाहून एअरपोर्टवर जाण्यासाठी खास भुयारी मार्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नरेंद्र मोदी देशाचे पहिले पंतप्रधान असतील ज्यांच्यासाठी सेव्हन आरसीआर येथून सफदरजंग एअरपोर्टवर जाण्यासाठी विशेष भुयारी मार्ग असेल. सुमारे दीड किलोमीटर लांबिचा हा बोगदा सुमारे दोन महिन्यांत पूर्ण होईल. कमाल अतातुर्क मार्ग, गोल्फ कोर्स आणि सफदरजंग रुग्णालय येथून हा भुयारी मार्ग जाईल आणि सफदरजंग येथील हेलिकॉप्टर हॅंगर येथे संपेल. पंतप्रधानांचे शासकीय निवासस्थान आणि सफदरजंग एअरपोर्टमधील अंतर सुमारे 3 किलोमीटर लांबिचे आहे.
काय आहे उद्देश
भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रमुख उद्देश पंतप्रधानांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देणे हा आहे. पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा जात असेल तर सर्वसामान्य जनतेला वाहतूक असुविधा सहन करावी लागते. यामुळे अशी असुविधा टाळता येईल.
डीएमआरसीकडून बांधकाम
केंद्रीय लोक निर्माण विभागाने 2010 पासून याच्या आराखड्याला सुरवात केली आहे. यावर आयबीचेही बारीक लक्ष आहे. या विभागाने याच्या बांधकामासाठी डीएमआरसीची निवड केली आहे. विशेष म्हणजे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि अतिविशिष्ट व्यक्ती सफदरजंग एअरपोर्टचा उपयोग करतात. अमेरिकेसह इतर राष्ट्रांमध्ये राष्ट्रप्रमुखाच्या शासकीय निवासस्थानाहून विमानतळावर जाण्यासाठी खास भुयारी मार्ग असतो.
आज शासकीय निवासस्थानी शिफ्ट होतील मोदी...वाचा पुढील स्लाईडवर