आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Fiver Down In India But Still On Best PM Position

लोकप्रियता घटली; परंतु मोदी अजूनही बेस्ट पीएम!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्ताने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मोदींची लोकप्रियता ६५ वरून ३७ टक्क्यांपर्यंत घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून ३० टक्क्यांसह मोदींवरच शिक्कामोर्तब झाले. त्यांच्या खालोखाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या पदासाठी पसंती मिळाली आहे. इंडिया टुडे ग्रुप आणि सिसेरोने "मूड ऑफ नेशन' या नावाने हे सर्वेक्षण केले आहे.
सरकारचे १० महिने; जनमत काय?
- महागाई, भ्रष्टाचार मुद्द्यांवर असमाधान, परराष्ट्र प्रतिमा सुधारल्याचे मात्र मान्य.
- धार्मिक ध्रुवीकरण नाही. संघाचा अजेंडा चालवत नाहीत.
- महागाई मुद्दा प्राधान्याने घ्यावा. मग भ्रष्टाचार, राम मंदिर शेवटी.
आज लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपच्या मतांचा टक्का वाढेल, पण जागा मात्र घटतील.
इंडिया टुडे-सिसेरो सर्वेक्षण निष्कर्ष
राहुल गांधी पक्षाचा कायापालट करतील ४६% लोकांना वाटते.
२०% मते पक्षात तेच पंतप्रधानपदाचे दावेदार
टॉप फाइव्ह सीएम
1. अरविंद केजरीवाल, दिल्ली
2. अखिलेश यादव, उ. प्र.
3. चंद्राबाबू नायडू, आंध्र प्रदेश
4. ममता बॅनर्जी, प. बंगाल
5. नवीन पटनायक, ओडिशा