आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Gifts Nawaz Sharif Shawl Mariyam Said Thank You Prime Minister

मोदींनी शरीफ यांच्या आईसाठी पाठवली शाल, मरियम म्हणाल्या, \'थँक यू पीएम \'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भारत दौ-यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शाल भेट दिली. ही शाल त्यांनी शरीफ यांच्या आईंसाठी दिली. शरीफ जेव्हा ही शाल घेऊन पाकिस्तानात पोहचले, त्यावेळी त्यांच्या कन्या मरियम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.' पीएम नरेंद्र मोदी. माझ्या आजीसाठी एवढी सुंदर शाल भेट म्हणून पाठवल्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे. माझ्या वडीलांनी स्वतः आपल्या आईला ही भेट दिली.' अशे त्यांनी ट्वीट केले.
मरियम शरीफ या भारत-पाकिस्तानदरम्यानचे संबंध सुधारावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. शरीफ यांना मोदींच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राजी करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मोदींनी जेव्हा शरीफ यांनी आमंत्रण पाठवले होते, त्यावेळी त्यांच्या उपस्थित राहण्याबाबत साशंकता होती. त्यामुळेच दोन दिवस यासंदर्भात कोणताही निकाल लागला नव्हता. मात्र, मरियम यांनी आपले वडील नवाज शरीफ यांना भारतात येण्यासाठी राजी केले अशी चर्चा आहे. हे भारताचे सकारात्मक पाऊल असल्याचे सांगत त्यांनीच होकार द्यायला सांगितला होता.
जेव्हा शरीफ येणार हे निश्चित झाले, त्यावेळीही मरियम यांनी ट्वीटद्वारे दोन्ही देशांमधील संबंध नवीन उंचीवर जावेत अशी इच्छा ट्वीटद्वारे व्यक्त केली होती. 'भारत आणि पाकिस्तान भूतकाळातील गोष्टींवर का वाद घालत आहेत. दोघांनी आपसांतील वैर विसरून नव्याने सुरुवात करायली', असे त्यांनी ट्वीट केले होते.

मरियम यांनी शालचा फोटो आणि मरियम यांच्याबाबत अधिक माहिती वाचा...पुढील स्लाईड्सवर