आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Give Inquiry Order, After Attacked On Christian School

‘सरकार’ हलले: ख्रिश्चन शाळेवर हल्ला, मोदींचे कारवाईचे निर्देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीतील वसंत विहार भागात शुक्रवारी अज्ञात व्यक्तींनी ख्रिश्चन मिशन-यांच्या शाळेची तोडफोड केली. गेल्या चार महिन्यांतील दिल्लीतील अशा प्रकारचा हा सहावा हल्ला आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना बोलावून ख्रिश्चन धार्मिक स्थळांवर हल्ले करणा-यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होली चाइल्ड ऑक्झिलियम स्कूलच्या प्राचार्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली तसेच सहा सीसीटीव्हीही फोडण्यात आले. शाळेची देणगीपेटीही गायब आहे. या घटनेमुळे शाळा बंद ठेवण्यात आली. शाळेने हा दरोड्याचा प्रकार असल्याचे म्हटले असले तरीही मोदी यांनी त्याची गांभीर्याने दखल घेत दिल्लीचे पोलिस आयुक्त बी.एस. बस्सी यांना बोलावून कारवाईचे निर्देश दिले.
मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी याच शाळेत शिक्षण घेतले आहे. शाळेच्या प्राचार्या सिस्टर लुसी यांनी त्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर इराणी यांनी राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि शाळेला भेटही देऊन पाहणीही केली. पंतप्रधानांनी या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केल्याचे बस्सी यांनी भेटीनंतर सांगितले.

देणगीपेटीही गायब
शाळा प्रशासनाने ही चोरीची घटना असल्याचा दावा केला. शाळेच्या प्राचार्य सिस्टर लुसी यांनी सांगितले की, महिला शिपाई शाळा उघडण्यासाठी आली असता प्रशासकीय तसेच प्राचार्यांचे कार्यालय उघडे होते. सहा सीसीटीव्ही फोडण्यात आले. प्राचार्यांच्या कार्यालयाची तसेच सर्व कपाटांची तोडफोड करण्यात आली. सर्व कागदपत्रे फेकण्यात आली होती. १२ हजार रुपये गायब आहेत. कॉरिडोरमधील कॅमे-यांची तोडफोड झाली असली तरीही आतील कॅमेरे सुरक्षित आहेत. फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
पुढे वाचा, गृहसचिवांशी चर्चा