आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मोदी भाषणेच झोडतील अन् राहुल पीएम होतील’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या प्रतिकृतीवरून भाषणे झोडता झोडता थकून जातील आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हेच भारताचे पंतप्रधान म्हणून पुढच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवतील, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय पोलाद मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी केले आहे. वर्मा हे फटकळ बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
पंतप्रधान पदासाठी अधिकृतरीत्या राहुल गांधी यांचे नाव घोषित केले नसले तरी पक्षाच्या बहुतेक महत्त्वाच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या नावाला आपली पसंती दर्शवली आहे, असे ते म्हणाले.