आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारांसोबतच्या \'टी पार्टी\'च्या एक दिवस आधी खासदारांसोबत मोदींची \'डिनर डिप्लोमसी\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पक्षाच्या सर्व खासदारांना डिनरचे आमंत्रण दिले आहे. डिनर पार्टीचे आयोजन भाजप मुख्यालयात रात्री 8 वाजता करण्यात आले आहे. यावेळी मोदी खासदारांसोबत लोकसभा निवडणूक तयारीची चर्चा करणार असल्याची माहिती आहे. भाजपचे लोकसभेत 117 आणि राज्यसभेत 47 खासदार आहेत.
15व्या लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन असून 20 फेबुवारी रोजी संपणार आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची आपेक्षा आहे, की संसदेचे अधिवेशन संपल्याबरोबर सर्व खासदारांनी संपूर्ण ताकदीने प्रचार सुरु करावा. भाजप कार्यकर्त्यांनी डोअर टू डोअर प्रचार करुन किमान 10 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प पक्षाने केला आहे. यात पक्षाचे खासदार आणि आमदार यांची भूमिका महत्त्वाची राहाणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात नुकत्याच झालेल्या सर्व्हेक्षणानुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, भाजपसाठी आम आदमी पार्टी (आप) मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेच्या 543 जागांपैकी आपने 350 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना 'आप' मोठे आव्हान वाटत नसले तरी सत्तेच्या मार्गातील मोठा अडसर वाटत आहे. आपच्या नेत्यांनी आधीच स्पष्ट केले आहे, की लोकसभा निवडणूकीत आपची थेट लढत काँग्रेसशी नसून भाजपशी होणार आहे.