आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Government In Big Trouble, Treasuray Empty In Nine Months

मोदी सरकार मोठ्या चणचणीत; नऊ महिन्यांतच तिजोरीत खडखडाट, बजेट घटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकार मोठ्या चणचणीत सापडले आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. यामुळे अनेक मंत्रालयांच्या बजेटमध्ये २० ते ५० टक्क्यांपर्यंत कपात झाली आहे. यामुळे अनेक योजना मंदावणार असून नव्या लांबणीवर पडतील. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आधीच अनुदान कपातीचे संकेत दिले आहेत.

अशी परिस्थिती ओढवण्याची दोन कारणे आहेत. पहिले-सरकारचे उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी राहिले. अर्थसंकल्पात १३.६ लाख कोटींच्या उत्पन्नाचे अनुमान होते. मात्र, आठ महिन्यांत आले ६.५७ लाख कोटी. उद्दिष्टाच्या ४३ टक्के कमी. या दरम्यान, खर्च हा निर्धारित हिशेबानेच होत राहिला. नोव्हेंबरपर्यंत योजनाबाह्य निधीत ७.८ लाख कोटी रुपये खर्चले. म्हणजेच उद्दिष्टाच्या ६४ टक्के.

केंद्राने तुटीचे उद्दिष्ट जीडीपीच्या ४.१% म्हणजेच ५.२५ लाख कोटी रुपये ठरवले हाेते. ही मर्यादा नोव्हेंबरमध्येच ओलांडली गेली.

दिव्य मराठी एक्स्पर्ट
अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांसाठी काहीसा सोपा राहील...
क्वचितच बजेटमध्ये कपात होते. केंद्राच्या बहुतांश योजनांत राज्य सरकारेही सहभागी असतात. एखाद्या राज्याने आपल्या वाट्याचे काम केले नाही तर केंद्राकडून मिळणारा निधी रोखला जातो. हा निधी आगामी अर्थसंकल्पात वळती होतो. क्रूड स्वस्ताईमुळे इंधन खर्चावरील सबसिडीत बचत होत आहे. यामुळे अर्थमंत्री अरुण जेटलींसाठी यंदाचा अर्थसंकल्प करणे तुलनेने सोपे राहील. असे असूनही सबसिडी कपातीवर त्यांचा भर असेल.
बीबी भट्टाचार्य, अर्थतज्ज्ञ, जेएनयूचे माजी व्हीसी

२६ फेब्रुवारीला रेल्वे, २८ ला अर्थसंकल्प सादर होणार
*मोदी सरकारचे हे पहिलेच पूर्ण बजेट, पहिल्यांदा शनिवारी सादर होणार
*२३ फेब्रुवारी ते ८ मेपर्यंत अधिवेशन
*दोन टप्प्यांत. पहिला २३ फेब्रुवारी ते २० मार्चपर्यंत, दुसरा २० एप्रिल ते ८ मेपर्यंत
*सरकारने १० अध्यादेश जारी केले. या अधिवेशनात संबंधित विधेयक संसदेकडून मंजुर करवून घ्यावे लागतील. पीएफ कायद्यात बदलासाठी विधेयक अधिवेशनात शक्य. कर्मचा-यांना मिळू शकते अंशदानापासून सूट.
पुढे वाचा कोणत्या मंत्रालयाची किती कपात? काय होईल त्याचा परिणाम?