आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OBC मध्ये 15 नवीन जाती: बिहारची गधेरी, झारखंडची झोरा, जम्मू-काश्मीरची लबाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्र सरकारने ओबीसीमध्ये 15 नवीन जातींचा समावेश केला आहे. - Divya Marathi
केंद्र सरकारने ओबीसीमध्ये 15 नवीन जातींचा समावेश केला आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. इतर मागासवर्गीय (ओबीसी) केंद्रीय यादीत 15 नवीन जातींचा समावेश करण्यास मंजूरी दिली आहे. यात बिहारमधील गधेरी/इतफरोश, झारखंडमधील झोरा आणि जम्मू-काश्मीरमधील लबाना जातींचा समावेश आहे. सरकारने बुधवारी यासंबंधीचे नोटिफिकेशन जारी केले आहे.
8 राज्यांनी 28 जातींची सूचना दिली होती...
- नॅशनल कमीशन ऑफ बॅकवर्ड क्लास (एनसीबीसी) ने आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडच्या एकूण 28 जातींचा समावेश करण्याची सूचना केली होती.
- यापैकी केंद्र सरकारने 15 जातींचा समावेश केला आहे.
नोटीफिकेशनमध्ये काय आहे ?
- सहायक संचालक बी.एल. मीणा यांची स्वाक्षरी असलेल्या नोटिफिकेशनमध्ये केंद्र सरकारने एनसीबीसी आणि जम्मू-काश्मीर सरकारच्या शिफारसी मान्य केल्या आहेत.
- त्यासोबतच राज्यांच्या ओबीसींच्या केंद्रीय यादीत त्यांचा समावेश करुन आणि सुधारण्याचे नोटिफिकेशन जारी करण्याचा निर्णय घेतला.
आरक्षणाचा फायदा मिळणार
- पंतप्रधानांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाने एनसीबीसी चा प्रस्ताव गेल्या महिन्यात मंजूर केला होता.
- केंद्रीय यादीतील या बदलामुळे या जातींतील नागरिकांना सर्व सरकारी नोकरी आणि केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
- तसेच या जातीतील नागरिकांना केंद्र सरकारच्या समाज कल्याण योजनांचा लाभ, शिष्यवृत्ती यासाठीही ते लाभार्थी ठरणार आहेत.
- केंद्र सरकार क्रिमी लेयरच्या नियमांनाही सोपे करण्याचा विचार करीत आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...