नवी दिल्ली - लोकांची सोने खरेदी कमी करण्यासाठी आणि घरांमध्ये पडलेले हजारो टन सोने चलनात आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने गोल्ड बाँड आणि सुवर्ण ठेव योजना आज (बुधवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केली आहे. याशिवाय इतरही महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले.
गोल्ड बाँड योजना
- "गोल्ड बॉंड‘ योजनेअंतर्गत सरकार 15,000 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री करण्याची शक्यता.
- एक व्यक्ती एका वर्षी फक्त 500 ग्रॅम गोल्ड बाँड खरेदी करू शकणार आहे.
- "गोल्ड बॉंड‘ची संपूर्ण जबाबदारी भारत सरकारची असेल.
- सोन्याच्या चालू किंमतीनुसार ठराविक दराने व्याज दिले जाणार. सरकारकडून वेळोवेळी व्याजदर निश्चित केला जाईल.
- "गोल्ड बॉंड‘ 5 ते 7 वर्षांसाठी विकत घ्यावे लागतील. शिवाय मुदतीपूर्वीच या योजनेतून
माघार घेता येणार आहे. "गोल्ड बॉंड‘ हस्तांतरणाची सुविधाही देण्यात आली आहे.
सुवर्ण ठेव योजना
- या योजनेंतर्गत लोक त्यांच्याकडील सोने जमा करु शकता आणि त्यावर व्याज मिळवू शकणार आहेत. हे व्याज करमुक्त असेल.
- सोने बँक किंवा एजंटकडे जमा करता येईल.
- यात तीन ठेव पद्धती आहे. कमी कालावधीसाठी, मध्यम आणि दिर्घ.
- कमी आणि मध्यम कालावधी काळात सोने परत घेण्याचाही पर्याय खुला असेल.
- सर्वसमान्य व्यक्तीपासून मंदिर, ट्रस्ट आणि बडे उद्योगपती यात गुंतवणूक करु शकतील.