आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Government Ministers Anant Geete Take Charge

शिवसेना झुकली, गितेंनी पदभार स्वीकारला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अवजड उद्योग खाते अनंत गिते यांना देण्यात आल्याने मंगळवारी दिवसभर मानापमान नाट्य रंगलेल्या शिवसेनेने अखेर बुधवारी नमते घेतले. दिल्ली सोडण्याआधी पदभार स्वीकारा, अशी सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करताच गिते यांनी मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली.
शिवसेनेच्या पदरात एकच मंत्रिपद मिळाल्याने अन्याय झाल्याचे मान्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेनेच्या अपेक्षा लवकरच पूर्ण करतील, अशी प्रतिक्रिया मंत्री अनंत गिते यांनी व्यक्त केली आहे. गिते पुढे म्हणाले की, जागतिक स्पर्धा असताना या खात्याला देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका वठवावी लागणार आहे. मरगळलेले उद्योग पुनरुज्जीवित करण्यावरही त्यांनी भर दिला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो मंत्रालयातील आपल्या कक्षात लावणार असल्याचे गिते यांनी या वेळी स्पष्ट केले.