आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Government Spy Rahul Gandhi; Congress Want Clarification From Prime Minister

मोदी सरकारकडून राहुल गांधींची हेरगिरी ; पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडे काँग्रेसने मागीतले स्पष्‍टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राहुल गांधी यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप काँग्रेसने मोदी सरकारवर केला आहे. याला राजकीय विरोधकांच्या हेरगिरीचे 'गुजरात मॉडेल' संबोधत काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांनी पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. दुसरीकडे, दिल्लीचे पोलिस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी ही नियमित प्रक्रिया असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांचा अधिकारी राहुल गांधींच्या १२, तुघलक लेन येथील घरी होता. तेथून राहुल यांच्याबाबतची माहिती गोळा करण्यात आली होती. पोलिसांच्या विहित नमुन्यात व्हीआयपीची माहिती गोळा केली जाते. आंदोलन, संकटकाळी पोलिसांना त्यांची घरे लवकर सापडत नाहीत. शिवाय नेतेमंडळी कामांत व्यग्र असल्यामुळे त्यांच्या खासगी स्टाफकडून ही माहिती जमवली जाते.

पुढे वाचा... ही माहिती जमा