आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Modi Government To Present Rail Budget On July 8, General Budget On July 10

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसदेचे अधिवेशन : 8 जुलैला रेल्वे तर 10 जुलैला सादर होणार केंद्रिय अर्थसंकल्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 7 जुलैपासून सुरुवात होणार आहे. 14 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये रेल्वे अर्थसंकल्प 8 जुलै रोजी सादर केला जाणार आहे. तर केंद्रिय अर्थसंकल्प हा 10 जुलैरोजी सभागृहात सादर करण्यात येणार आहे.
यासंदर्भातील अंतिम निर्णय संसदीय कामकाज विभागाच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे. सुमारे महिनाभर चालणा-या या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून जनतेला मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहेत. विरोधकांसह जनताहा सरकारच्या आगामी अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसली आहे.
करमर्यादा वाढण्याची अपेक्षा?
अर्थसंकल्पातून प्राप्तीकर भरणा-यांना सवलतीबाबत अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे याबाबतच्या तर्क वितर्कांना उधाण आले आहे. सरकार पाच लाख रुपये वैयक्तीक वार्षिक उत्पन्न असणा-यांना सूट देण्याच्या विचारात असल्याची सध्या चर्चा आहे. लोक अशा प्रकारचे विविध अंदाज बांधत असले तरी, सरकारसाठी तसे करणे सोपे नसेल. त्यामुळे मधला मार्ग काढून सरकार प्राप्तीकराची मर्यादा तीन लाख रुपयांपर्यंत वाढवू शकते.

मर्यादा वाढवण्याच्या अडचणी

- वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणा-यांना आयकराच्या मर्यादेबाहेर ठेवणे सरकारसाठी सोपे नसेल. त्यामध्ये सरकारला अनेक अडचणी येऊ शकतात.

- माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वातील संसदीय समितीने केलेल्या शिफारसींमध्ये वार्षिक पाच लाख रुपये कमावणा-यांना प्राप्तीकर मर्यादेबाहेर ठेवावे या शिफारसीचा समावेश होता. सरकारने ते मान्य केले तर, सरकारला दरवर्षी 60 ते 70 हजार कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. त्याशिवाय गृहकर्जाच्या व्याजावरील सूट 1.5 लाख रुपयांवरून दोन लाख रुपये केल्यासही सरकारला हजारो कोटींचे नुकसान सोसावे लागणार आहे.
फोटो कॅप्शन - लोकसभेचा फाईल फोटो