आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Government\'s First Day: Narendra Modi Nawaz Sharif Meeting

नवाझ शरीफांची जामा मशिदीला भेट; लाल किल्ल्याकडे रवाना; वाजपेयींनाही भेटणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारत दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आज (मंगळवार)सकाळी सव्वा नऊ वाजता जामा मशिदीत पोहोचले. इमाम बुखारी यांच्याशी 20 मिनिटे चर्चा केली. नंतर ते लाल किल्ल्याकडे रवाना झाले. जामा मशिदीचे इमाम बुखारी यांनी भारत- पाकमधील मतभेद दूर व्हावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

शरीफ दुपारी साडे बारा वाजता नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. तसेच देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची भेटणार अवाहे. त्यानंतर ते पाकिस्तानकडे रवाना होणार आहे.

नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांच्या भेटीचा अजेंडा काय असेल याबाबत समजू शकले नाही. दरम्यान, मोदींनी सोमवारी रात्री उशीरा परराष्ट्र मंत्रालयासोबत चर्चा केली. मोदी आणि शरीफ यांच्या मंगळवारी अर्धा तास चर्चा होईल. अर्धा तासात दोन्ही नेते कोणत्या मुद्यावर चर्चा करतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दुपारी 12 नंतर दोन्ही नेत्यांत द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा होणार आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, शहीद हेमराज सिंह यांच्या पत्नीने शरीफ यांना केलेली जळजळीत मागणी