आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Govt. Railway Minister Sadanand Gouda Latest News

रेल्वे भाडेवाढ प्रस्ताव सरकारने गुंडाळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रवासी भाडे व मालभाड्यात दरवाढीचा प्रस्ताव गुंडाळला जाण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी ‘दिव्य मराठी नेटवर्क’ला सांगितले की, रेल्वेची परिस्थिती सुधारण्यासाठी दरवाढ करणे हा एकमेव पर्याय नाही.

याबाबत अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कॅबिनेट बैठकीत घेतला जाईल, असे गौडा म्हणाले. प्रवासी भाड्यात 14 टक्के व मालवाहतूक भाड्यात 5 टक्के दरवाढीचा प्रस्ताव रेल्वेने ठेवला होता. मात्र, यावर अंतिम निर्णय होऊ शकला नव्हता.