आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parliament Session Modi Govt Bjp Congress Lok Sabha Rajya Sabha News And Updates

गांधींचा मंत्र,‘करा किंवा मरा’; आमचा ‘करू आणि करणारच’; क्रांती दिनी मोदींचा संकल्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी \'संकल्पाकडून सिद्धी\'कडे ही घोषणा केली आहे. - Divya Marathi
मोदींनी \'संकल्पाकडून सिद्धी\'कडे ही घोषणा केली आहे.
नवी दिल्ली- देशासमोर गरिबी, निरक्षरता, भ्रष्टाचार ही मोठी आव्हाने असल्याचे सांगून त्यांचे उच्चाटन करण्यासाठी आगामी पाच वर्षांत ‘करू आणि करणारच’ असा आमचा निर्धार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारत छोडो आंदोलनाच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त लोकसभेत आयोजित चर्चेत बुधवारी ते बोलत होते.  

१९४२ ते १९४७ दरम्यान भारतात मोठी ऊर्जा पाहायला मिळाली होती. तशीच ऊर्जा २०१७ ते २०२२ दरम्यान देशभक्तीने भारावलेले वातावरण असले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चले जाआेची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा करा किंवा मरा असा महात्मा गांधींनी म्हटले होते. आम्ही मात्र देशासमोरील गरिबी, निरक्षरता, भ्रष्टाचारासारख्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी करू आणि करणारच, अशी घोषणा देत आहोत, असे मोदी म्हणाले. आगामी पाच वर्षांत ‘संकल्प ते सिद्धी’ अशा पद्धतीने काम केले जाईल. २०२२ मध्ये देशाला अनेक सकारात्मक बदल झाल्याचे प्रत्यक्षात अनुभवायला येतील. परंतु देशातील सर्वपक्षीय खासदारांनी आपले सर्व मतभेद बाजूला ठेवून राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी व्हायला हवे. तरच स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नांची खऱ्या अर्थाने पूर्तता होईल. म्हणूनच २०१७ ते २०२२ या पाच वर्षांत झपाटल्यासारखे काम करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन मोदींनी केले.  

पाकव्याप्त काश्मीरला परत मिळवण्याची जनतेची इच्छा
१९६२ च्या युद्धावरून देशाला खूप काही शिकायला मिळाले. आमचे सैन्य कोणत्याही आव्हानाचा मुकाबला करण्यास सज्ज आहे, असे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. डोकलाममध्ये चीनसोबत दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. १९४८ पासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरचा प्रदेश परत मिळवावा, ही जनतेची सर्वात मोठी इच्छा आहे, असे जेटली म्हणाले.  राज्यसभेत बुधवारी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष चर्चेत जेटली बोलत होते. आतापर्यंतच्या अनेक दशकांत देशाने अनेक आव्हानांचा मुकाबला केला आहे. परंतु प्रत्येक आव्हानासोबत देश बळकट होत उभा राहिला आहे. १९६२ मध्ये भारत-चीन युद्ध झाले होते. त्या युद्धातून भारताने अनेक गोष्टी शिकल्या आहेत. म्हणूनच १९६२, १९६५, १९७१ च्या युद्धातून सैन्य बळकट झाले.

धर्माच्या नावावर होणारी हिंसा थांबवावी  
देशात दहशतवाद, धर्म आणि राजकारणाच्या नावावर हिंसाचार होत आहे. तो तत्काळ थांबला पाहिजे. दहशतवाद आणि नक्षलवाद या देशासमोरील मोठी आव्हाने आहेत. सीमेवर आणि देशात काही लोकांनी शस्त्रे हाती घेतली आहेत. देशाने त्याच्या विरोधात एकजूट दाखवावी, असे आवाहन जेटली यांनी केले.  

सोनिया गांधींनी सरकार, संघावर केला हल्लाबोल  
स्वातंत्र्याऐवजी भीतीचे वातावरण तयार होत आहे. तिरस्कार, फूट पाडण्याच्या राजकारणाची पडछाया दिसू लागली आहे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेतील भाषणातून सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला केला. सामाजिक, लोकशाही आणि उदारमतवादी मूल्यांवर संकट आहे. चर्चेला वाव नाही, अशी टीका त्यांनी केली
 
मोदींनी दिला 'संकल्पातून सिद्धी'चा नारा 
- मोदी म्हणाले, 'इतिहासातून आम्हाला शिकण्याची गरज आहे. त्या घटनांमधून बोध घेऊन आज आम्ही काय करु शकतो याचा प्रयत्न केला पाहिजे.'
- स्वातंत्र्याच्या आंदोलनात अनेक चढ-उतार आले. भारत छोडो आंदोलन हे त्यातील शेवटचे व्यापक जनसंग्रह असलेले आंदोलन होते. 1942 मध्ये असे वातावरण होते की प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्यांची आस होती. 
- टिळकांनी संपूर्ण स्वराज्याचा नारा दिला होता. 1920 मध्ये महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरु केले होते. भगतसिंह, राजगुरु, चाफेकर बंधुंनी देशासाठी बलिदान दिले होते. 
- भारत छोडो आंदोलनात गांधीजींनी करु किंवा मरुचा नारा दिला, ही घोषणा देशासाठी एका मंत्रासारखी होती. गांधीजींनी संपूर्ण स्वराज्यापेक्षा काहीही कमी घेणार नाही अशी भूमिका घेतली. 
- मोदींनी एका पुस्तकाचा संदर्भ देत सांगितले, की त्यावेळी प्रत्येक व्यक्ती हा एक नेता झाला होता. प्रत्येक घर हे भारत छोडो आंदोलनाचे केंद्र झाले होते. 1942 नंतर जिथे-जिथे वसाहतवाद होता तिथे क्रांति भडकली होती. याचे श्रेय संपूर्ण भारताला होते. 
 
हेही वाचा...
बातम्या आणखी आहेत...