आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना यंदाही मिळणार 4% दराने कर्ज, केंद्र सरकारची योजनेला एका वर्षाची मुदतवाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शेतीसाठी या वर्षी शेतकरी स्वस्त दराने कर्ज घेऊ शकेल. यासाठी गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेल्या योजनेला केंद्र सरकारने बुधवारी एक वर्षाची मुदतवाढ दिली अाहे.  दरम्यान, देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील कर्जमाफीच्या प्रमुख मागणीवर मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
 
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ एक वर्षापर्यंत तीन लाख रुपयांचे कृषी कर्ज घेणारे शेतकरी घेऊ शकतील. या कर्जावर ९ टक्के व्याज आकारले जाते. मात्र, केंद्र सरकारकडून यावर २% सबसिडी देण्यात येते. नियमित आणि वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजदरात आणखी ३% सबसिडी मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना व्याजदरात एकूण ५% सूट मिळू शकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला केवळ ४% व्याजच फेडावे लागेल. सन २०१७-१८ साठी ही योजना सुरू ठेवण्यासाठी मंत्रिमंडळाने २०,३३९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. आरबीआय आणि नाबार्डही हा व्याजदर लागू करतील.

यांना मिळेल लाभ : एक वर्षासाठी तीन लाख रुपयांपर्यंत कृषी कर्ज घेणारे सर्व शेतकरी.
 
कशी मिळेल ५% सबसिडी
कृषी कर्जावर ९ टक्के व्याज आकारले जाते. प्रारंभी २% सबसिडी मिळेल. वेळेवर कर्जफेड केली तर आणखी ३% सबसिडी दिली जाईल. म्हणजे केवळ ४% व्याजदराने कर्जफेड करावी लागेल.
 
आधार आवश्यक : कृषी कर्जासंबंधी सर्व बँक खाती या वर्षी आधार क्रमांकाने जोडणे अनिवार्य करण्यात अाले अाहे.
 
बातम्या आणखी आहेत...