आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ईएमआयवर AC विकणार मोदी सरकार, याच वर्षी लागू होणार योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाजारातील एयर कंडिशनर 5 स्टार असल्याचा दावा करत असले, तरीही प्रत्यक्षात ते 3.7 स्टार आहेत. (फाईल) - Divya Marathi
बाजारातील एयर कंडिशनर 5 स्टार असल्याचा दावा करत असले, तरीही प्रत्यक्षात ते 3.7 स्टार आहेत. (फाईल)
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारने वीज बचत करण्यासाठी देशभर स्वस्त दरांत एलईडी लाईट विकण्याची योजना लागू केली होती. त्याच प्रकारची योजना एयर कंडिशनर (AC) विकण्यासाठी लागू केली जाणार आहे. सर्वांना वीज बचत करणारा AC विकत घेता यावा यासाठी सरकार ईएमआय अर्थातच मासिक हप्त्यांमध्ये त्यांची विक्री करणार आहे. 

सप्टेंबरपासून स्कीम सुरू होणार?
एलईडी बल्ब स्कीमने प्रेरित होऊन एनर्जी एफिशियंट एयर कंडिशनर तयार करण्यात आले आहेत. सरकारच्या सोबतीने एनर्जी एफिशियंसी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) ने अशा प्रकारचे 1 लाख AC खरेदी केले आहेत. मात्र, त्यांची किंमत जास्त असल्याने सध्या त्या केवळ सरकारी कार्यलये किंवा एटीएमच्या खोलीतच लावले जात आहेत. सर्वसामान्य मध्यमवर्गियांना ते खरेदी करता यावे, यासाठीच सरकार ईएमआय योजना लागू करत आहे. ईईएसएलचे एमडी सौरभ कुमार यांनी भास्कर समूहाला ही माहिती दिली. याच वर्षी सप्टेंबरपासून स्कीम सुरू होणार अशी अपेक्षा आहे.
 
बाजारातील 5 स्टार AC प्रत्यक्षात 3.7 स्टार
सध्या बाजारात उपलब्ध असलेले एयर कंडिशनर 5 स्टार असल्याचा दावा करत असले, तरीही प्रत्यक्षात ते 3.7 स्टार आहेत. ग्राहकांना प्रत्यक्ष 5.3 स्टार रेटिंग असलेले एयर कंडिशनर उपलब्ध करून देणे हे सरकार आणि ईईएसएलचे उद्दिष्ट आहे. 
 
50 ते 60 हजार रुपये किंमत
एनर्जी एफिशियंट एसी 40 टक्क्यांपर्यंत वीजेची बचत करू शकतात. त्यानुसार, एसीची किंमत 50 ते 60 हजार रुपये जास्त नाही. त्यातही ईएमआयमध्ये ते खरेदी करणे सहज शक्य होईल.
 
बातम्या आणखी आहेत...