आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढत्या दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी मोदी सरकार स्थापणार काऊंटर-टेररिझम अकॅडमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - प्रतिकात्मक)
नवी दिल्ली - इराक आणि इस्रायलमध्ये वाढच्या दहशतवादाचा प्रभाव भारतावरही होण्याची शक्यना नाकारता येत नाही. यात शक्यतेमुळे मोदी सरकारने काऊंटर-टेररिझम अकॅडमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावावर कामही सुरू करण्यात आले आहे. ही देशातील अशी एकमेव शिक्षण संस्था असेल, ज्याठिकाणी जवानांना प्रशिक्षण, संशोधन आणि न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) संदर्भात एकाचवेळी माहिती मिळेल.

गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'या प्रस्तावावर कामही सुरू करण्यात आले आहे. या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण संस्थेबरोबरच फॉरेन्सिक सायन्स सेंटर फॉर एक्सिलंसही असेल. तसेच अंतर्गत सुरक्षेच्या मुद्यावर ही संस्था संशोधनही करेल. सध्या तरी देशात केवळ अंतर्गत सुरक्षेबाबत विचार करणारी एकही संस्था नाही.'
पदड्यामागील दहशतवाद वाढण्याची शक्यता
आखाती देशांमध्ये अल कायदा आणि आयएसआयएस सारख्या संघटनांचा परिणाम आगामी काळात भारतातही होऊ शकतो, अशी भीती सरकारला आहे. त्यामुळेच ही अकॅडमी स्थापन करण्याचा निर्णय असल्याचे सांगितले जात आहे. सरकारच्या मते, थेट शक्य नसले तरी या संघटनांना सिमी आणि इंडियन मुजाहीदीन सारख्या दहशतवादी संघटना पडद्यामागून मदत करू शकतात, असे सरकारला वाटते. तसेच राष्ट्रीय गुप्तचर संस्था (NIA) आणि इतर गुप्तचर संस्थांनाही या संस्थेची मदत होईल असे सरकारला वाटते आहे.