आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटकाळात मदतीसाठी डायल करा ११२ , पुढील वर्षी देशभरात मिळणार सेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निर्भया प्रकरणाला अडीच वर्ष पूर्ण झाले अाहेत. महिलांना तात्काळ मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती जे. एस. वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने सुचविल्याप्रमाणे ‘नॅशनल इमरजेंसी रिस्पाॅन्स सिस्टिम’ (एनईअारएस)सुरू करण्याची माेदी सरकारने तयारी केली असून पुढच्या वर्षात ही सेवा संपूर्ण देशभर सुरु हाेणार अाहे.

गृह विभागातील सूत्रांनी दलेल्या माहितीनुसार, ११२ या तीन अाकडी क्रमांकासह ‘निर्भया पाेर्टल’ बनविले जात असून ज्या महिला ११२ क्रमांकावर तक्रार करू इच्छित नाही त्या थेट या पाेर्टलवरून मदत मागू शकतात. १६ डिसेंबर २०१२ राेजी निर्भया प्रकरणाने देशभरातील महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न चिन्ह उभे केले हाेते. संयुक्त पुराेगामी अाघाडी सरकारने महिलांना सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले होते.

परंतु त्यांचे सरकार पायउतार झाल्याने ही योजना काहीशी रखडली होती. न्यायमूर्ती जे. एस. वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवृत्त न्यायमूर्तीद्वय लीला सेठ व गाेपाल सुब्रह्मण्यम यांच्या समितीने एनईअारएसच्या माध्यमातून महिलांना तातडीने सेवा देण्याची शिफारस केली हाेती. माेदी सरकारने या शिफारशीची गंभीर दखल घेत ही यंत्रणा राबविण्यासाठी अायटी कंपनीकडून ही यंत्रणा राबविण्यासाठी पाच वर्षासाठी करार केला जाणार अाहे. एनइअारएसचे जाळे पसरण्यासाठी गृहमंत्रालयाकडून एक ते दीड वर्षाचा अवधी कंपनीला दिला जाणार अाहे.

ही यंत्रणा पाेलिसांच्या १००, अग्नीशमनच्या १०१, रुग्णवाहिकेच्या १०२ पेक्षाही प्रभावी राहणार असून ११२ क्रमांकावर महिलांच्या तसेच अन्य अाकस्मिक तक्रारीची नाेंद करता येणार अाहे. एनइअारएसकडून संबंधित विभागाला तातडीने सूचना देण्यात आल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...