आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अच्छे दिन’ आले की नाहीत? मोदी स्वत: घेताहेत आढावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन’बाबत सोशल मीडियावर सुरू असलेली नकारात्मक मोहीम मोडून काढण्यासाठी सरकार कामाला लागले आहे. 2 वर्षांत झालेली कामे जनतेसमोर आणण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी सरकार ट्रान्सफॉर्म इंडिया ही एक विशेष वेबसाइट लाँच करत आहे.

या वेबसाइटवर सर्व मंत्रालयांनी केलेल्या चांगल्या कामांची माहिती असेल. आपल्या सर्वात चांगल्या दोन कामांची माहिती डिजिटल रूपात द्यावी, असे आदेश सर्व मंत्रालयांना देण्यात आले आहेत. ही माहिती लोकांसमोर सादर करून लोकांना ‘अच्छे दिन’आल्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळातही शायनिंग इंडिया या नावाने अशीच मोहीम राबवण्यात आली होती. पण ही मोहीम पाच वर्षे पूर्ण झाल्यावर राबवण्यात आली होती. मोदी सरकार मात्र आपल्या कामगिरीची माहिती दोन वर्षांतच देण्याची तयारी करत आहे.

रेल्वे, नगरविकास, पेट्रोलियम, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने कामांची माहिती दिली असली तरी अजूनही काही मंत्रालयांनी ती सादर केली नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, जनतेला तत्काळ फायदा झालेल्या योजनांची माहिती द्यावी, अशी पीएमओची अपेक्षा आहे.