आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: प्रगती तर सोडाच, एकाच वर्षात मोदी सरकारची चमकही हरवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात अच्छे दिन आणू, असे आश्वासन देत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर विराजमान झालेत. त्‍यावेळी उद्योग क्षेत्राला त्‍यांच्‍याकडून अधिक अपेक्षा होती. मात्र, एकाच वर्षात महत्‍त्‍वाच्‍या 8 इंडस्ट्रियल सेक्टर्सची प्रगती खुंटल्‍याचे समोर आले आहे. आर्थिक वर्ष 2014-15 मध्‍ये या 8 सेक्टर्सचा एकूण ग्रोथ रेट 3.8% केवळ एवढच नोंदवला गेला. मागील पाच वर्षांचा विचार केला तर तो सर्वांत कमी आहे. या आर्थिक वर्षांत पहिल्‍या तीन महिन्‍यांत म्‍हणजेच एप्रिल ते जूनपर्यंत या सर्व सेक्टर्सची ग्रोथ रेट केवळ 2.4% आहे. ती गत वर्षीच्‍या पहिल्‍या क्वॉर्टरमध्‍ये 6% होती.
कोणते 8 सेक्टर्स निर्धारित करतात इंडस्ट्रियल ग्रोथ ?
कोळसा, क्रूड ऑयल, नैसिर्गिक गॅस, रिफायनरी प्रोडक्ट्स, फर्टिलाइजर, स्टील, सिमेंट आणि इलेक्ट्रिसिटी.
कोळसा, रिफाइनरी सोडून सर्व सेक्टरमध्‍ये पीछेहाट
केंद्र सरकारच्‍या डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अॅण्‍ड प्रमोशनच्‍या आकडेवारीनुसार, कोळसा आणि रिफाइनरी सेक्टर्स सोडून इतर सर्व सेक्टर्समध्‍ये प्रोडक्शन पीछेहाट झाली.
सेक्टर
एप्रिल-जून 2014
एप्रिल-जून 2015
कोळला
6.6
7.3
क्रूड ऑयल
-0.1
-0.9
नेचुरल गैस
-3.9
-4.2
रिफाइनरी प्रोडक्ट्स
-1.3
4.2
फर्टिलाइजर्स
8.6
2.4
स्टील
7.2
2.8
सीमेंट
9.6
0.9
इलेक्ट्रिसिटी
11.3
1.5
या 8 KEY सेक्टर्सचा एकूण ग्रोथ रेट
6.0
2.4
(हे आकडे केंद्र सरकारच्‍या डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अॅण्‍ड प्रमोशन नुसार आहेत.)
मागील पाच वर्षांत केव्‍हा रहिला सर्वांत चांगला ग्रोथ रेट?
मागील पाच वर्षांचा विचार केला तर 2010-11 मध्‍ये 8 सेक्टरमध्‍ये सर्वांत चांगला म्‍हणजेच 6.6% ग्रोथ रेट होता. त्‍यानंतर 2012-13 ग्रोथ रेट 6.5% राहिला. गत वर्षी त्‍यात पीछेहाट होऊन केवळ 3.8% वर आला. मोदी सरकार सत्‍तेत आल्‍यानंतर महत्‍त्‍वाच्‍या सेक्टर्सची प्रगती खुंटतच गेली. 2010-11मध्‍ये स्टील सेक्टरमध्‍ये ग्रोथ रेट 13% पेक्षा अधिक होता. तो आता केवळ 2.8% वर आला आहे.
'अच्छे दिन' केवळ कोळसा सेक्टरमध्‍ये
कोळशाचे प्रोडक्शन 2010-11 मध्‍ये -0.2% वर होते. त्‍यात आता वाढ झाली असून, या आर्थिक वर्षांत 8.5% झाली आहे. त्‍यामुळेच कोळसा पॉलिसीनुसार, कोल ब्लॉकचा ऑक्शन झाला होता. पण, विजेचे उत्‍पादन खूप कमी झाले. मागील वर्षांच्‍या पहिल्‍या तीन महिन्‍यांमध्‍ये ते 11.3% टक्‍के होते. यंदा एप्रिल ते जूनदरम्‍यान त्‍यात पीछेहाट झाली असून, 1.5% वरच आले. मागणीच कमी आहे, असे कारण उत्‍पादन कमी होण्‍या मागे दिले जात आहे. बहुतांश राज्‍यामध्‍ये विजेची मागणी वाढली नसल्‍याचे सांगितले जात आहे. इतर सेक्‍सर्समधील ग्रोथ कमी होण्‍याचे प्रमुख कारण म्‍हणजे आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत स्टील, सिमेंट आणि पेट्रोलियम प्रोडक्ट्समच्‍या किमती कमी झाल्‍या आहेत. रियल स्टेट सेक्टरमधील मंदीचा फटकासुद्धा सिमेंट आणि स्टीलवर पडला.
EXPERT VIEW : एकाच वर्षात निर्णय झाला; पण कृती नाही
डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अॅण्‍ड प्रमोशनच्‍या आकडेवारीवर जेएनयूचे इकोनॉमिस्ट बी.बी. भट्टाचार्य यांनी divyamarathi.com ला सांगितले, नवीन सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. पण, त्‍यावर काहीच कृती केली नाही. त्‍यामुळे हे नकारात्‍मक आकडे दिसत आहेत. केवळ एफडीआय आणि अमेरिका-चीन-जापानवरून होणा-या गुंतवणुकीच्‍या गप्‍पा केल्‍या जात आहे. या डिपार्टमेंटच्‍या आंकड्यांवर सर्व सेक्टर्ससाठी directional indication च्‍या रूपात घेणे आवश्‍यक आहे. दरम्‍यान, पुढच्‍या वर्षी जे आकडे येतील त्‍यात अजून फरक दिसेल.
राहुल बजाज यांनी म्‍हटले- चमकदार कामगिरीच नाही
हे आकडे जाहीर होण्‍याच्‍या एका दिवसापूर्वीच प्रसिद्ध उद्योजक राहुल बाजाज यांनी एका दिवसापूर्वीच मोदी सरकारच्‍या बाबतीत आपले मत व्‍यक्‍त केले होते. ते म्‍हणाले, ऐतिहासिक विजय प्राप्‍त करून सत्‍तेत आलेले एनडीए सरकार आता आपला झगमगाट हरवताना दिसत आहे. एका वृत्‍त वाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत त्‍यांनी म्‍हटले, “ गत वर्षी मेमध्‍ये देशाला एक शहंशाह (नरेंद्र मोदी) मिळाला होता. 20-30 वर्षांत जगातील एकाही देशात कुणालाच असे स्‍पष्‍ट मिळाले नाही. असे असताना आता या सरकारचा प्रभाव राहिला नाही. मी मोदी सरकारच्‍या विरोधात नाही. मात्र, मी तेच बोलत आहे जे सर्व लोक बोलत आहेत. ”

पुढील स्‍लाइड्वर पाहा, मागील पाच वर्षांतील फाइनेंशियल ईयरचा ग्रोथ रेट