आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NSG: ताश्कंदसाठी PM मोदी रवाना, जिनपिंग-पुतिन यांची घेणार भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताश्कंद येथे होणाऱ्या SCO मध्ये सहभागी होण्यासाठी मोदी गुरुवारी रवाना झाले. - Divya Marathi
ताश्कंद येथे होणाऱ्या SCO मध्ये सहभागी होण्यासाठी मोदी गुरुवारी रवाना झाले.
नवी दिल्ली/सेऊल - अणू पुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) सहभागी होण्याचे भारताच्या प्रयत्नांनी वेग घेतला आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ताश्कंद येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) बैठकीसाठी मोदी रवाना झाले आहेत. येथे ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार आहेत. अशी माहिती आहे आहे की यावेळी होणाऱ्या चर्चेत मोदी भारताच्या एनएसजी सदस्यत्वाला पाठिंबा देण्यासाठी या दोन्ही नेत्यांना विनंती करतील. तर, सेऊलमध्ये आजपासून एनएसजी सदस्यत्वासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर गेले आहेत. ते भारताचा दावा मजबूत करतील. फ्रान्सने भारताला पाठिंबा दर्शविला आहे.
चीन आणि अन्य काही देशांनी त्यास विरोध दर्शवला आहे.
मोदी - शिनपिंग यांच्यात आज चर्चा
ताश्कंदमध्ये गुरुवारी होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची चर्चा होणार आहे. त्या वेळी मोदी हे एनएसजी सदस्यत्वासाठी चीनचा पाठिंबा मागण्याची शक्यता आहे. यासंबंधीची माहिती योग्य वेळी दिली जाईल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी बुधवारी सांगितले.

४८ सदस्य देशांच्या एनएसजीची सोमवारपासून बैठक सुरू झाली. या गटात भारताचा सहभाग व्हावा यासाठी जयशंकर येथे लॉबिंग करण्यासाठी आले आहेत. जयशंकर सेऊलच्या दौऱ्यावर आहेत ही बाब खरी आहे. मात्र, एनएसजी सदस्यत्वासंबंधीची बैठक अद्याप सुरू झाली नाही. ही नाजूक आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. सद्य:स्थितीत त्याबाबत अटकळी बांधू शकत नाही, असे नवी दिल्लीत सरकारी सूत्रांनी सांगितले.

परराष्ट्र विभागातील वरिष्ठ अधिकारी अमनदीपसिंग गिल भारताला पाठिंबा मिळवण्यासाठी सोमवारपासून सेऊलमध्ये आहेत, अशी माहिती अन्य एका सूत्राने दिली. दरम्यान, चीनने भारताबाबत दुटप्पी भूमिका कायम ठेवली आहे. भारत अाणि पाकिस्तानची सरमिसळ करत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की दोन देशांच्या सदस्यत्वासाठी एनएसजीने तीन वेळा अनधिकृत चर्चा केल्या. भारताच्या निर्दोष अण्वस्त्र प्रसारबंदीचे (एनपीटी) रेकॉर्ड पाकिस्तानशी तपासून पाहावे. एनएसजी एकमतावर आधारित तत्त्वांवर चालते. मात्र, एखाद्या देशाचे भारतविरोधी मत त्यांचा प्रवेश रोखू शकते. या गटातील बहुतांश सदस्यांचा भारताला पाठिंबा आहे. चीनशिवाय, तुर्की, दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि न्यूझीलंड आदी देश भारताच्या प्रवेशाच्या बाजूने नाहीत. भारताने एनपीटीवर स्वाक्षरी केली नसल्याचे कारण देत चीनने विरोध सुरू ठेवला आहे. मात्र, एनएसजीमध्ये प्रवेश करण्यासाठी त्याची आवश्यकता नसल्याचे भारताचे मत आहे. भारताने २०३० पर्यंत अणुऊर्जेद्वारे ६३,००० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
बातम्या आणखी आहेत...