आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशरत प्रकरणी मोदी अडचणीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातमधील इशरत जहाँसह अन्य तिघांच्या एन्काउंटरबद्दल मुख्यमंत्री नरेंद्र मोदी तसेच त्यांचे निकटचे सहकारी अमित शहा यांना पदोपदी माहिती दिली जात होती. एका वेबसाइटने हा दावा केला आहे.

याप्रकरणी सीबीआयला 4 जुलैपूर्वी आरोपपत्र दाखल करावयाचे असून राज्य सरकारच्या ज्येष्ठ मंत्र्यांना सतत माहिती दिली जात होती, असा दावा वेबसाइटने केला आहे. दरम्यान, सीबीआयनुसार गुप्तचर विभागाचे (आयबी) विशेष संचालक राजेंद्रकुमार आणि अमित शहा हे दोघे कटाचे प्रमुख सूत्रधार आहेत.