आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन तलाक, काश्मीर, काळ्या पैशाच्या मुद्दावर मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातील 5 मुद्दे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काश्मीर, 3 तलाक आणि काळ्या पैशाच्या मुद्याचा उल्लेख केला. काश्मीरच्या मुद्दयावर मोदी म्हणाले की, ना गोली से, ना गाली से.. समस्या का हल होगा काश्मीरी लोगो को गले लगाने से' तर काळ्या पैशाबाबत त्यांनी गेल्या तीन वर्षात सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त काळा पैसा बाहेर काढल्याचे सांगितले.
 
1) काश्मीरचा विकास
-  लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काश्मीरला स्वर्गाच्या रुपात पुर्ननिर्मित करण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत. काश्मिरी नागरिकांच्या स्वप्नपुर्तीसाठी आम्ही कटिबध्द आहोत. काही मुठभर फुटिरतावादी हा मुद्दा अधिक जटील कसा बनेल यासाठी प्रयत्न करत आहेत.
 
2) तीन तलाख 
तीन तलाकच्या मुद्द्यावर महिला पुढे आल्या, त्यांनी हा मुद्दा लावून धरला. न्यू इंडियात महिलांना आपलं स्वप्न पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य असेल, याचा उल्लेख त्यांनी केला. त्यांनी या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या महिलांचा कौतुक केले.
 
3) आस्थेच्या नावावर हिंसचार नको
हा देश बुद्धाचा आहे, महात्मा गांधींचा आहे. त्यामुळे आस्थेच्या नावावर हिंसेच्या मार्गाला बळ दिले जाणार नाही. देशात कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेणार नाही, असे पंतप्रधानांनी सांगितले.
 
4) युवा मतदारांवर नजर
देशाच्या विकास यात्रेत सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी युवकांना केले. 'चलता है...' ची मानसिकता बदलावी लागणार, 'हे होऊ शकते..हे घडू शकते' असा सकारात्मक विचार मनात ठेवावा लागेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. 
 
5) काळेधन मुख्य प्रवाहात आणणार
-  मोदी म्हणाले की, गरिबांना लुटणारे चैनीत झोपू शकणार नाहीत.  सरकारने 800 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त केली आहे. एवढ्या मोठ्या देशात जीएसटी लागू झाल्याचे जगात आश्चर्य व्यक्त होत आहे. देश प्रगतीपथावर आहे, गरिबांची प्रगती होत आहे.
 
बातम्या आणखी आहेत...